प्रेयसीला लग्नाचे अमिष दाखवून तरुणाने केले अत्याचार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 5 October 2019

तरुणींवर अत्याचार झाल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचतो. तशीच एक वाईट घटना जरीपटका येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणी सोबत घडली. जरीपटका याच भागामध्ये असलेल्या एका  रोजगार मार्गदर्शन  कंपनी मध्ये ती कामाला होती. त्याच ठिकाणी तिची ओळख कुणाल सोबत झाली. कुणाल ही त्याच ठिकाणी कामाला होता. काही दिवसांनी त्या दोघांची मैत्री झाली. त्यानंतर त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले १ सप्टेंबर २००१८ ला कुणाल, पीडित तरुणी, तिची मैत्रीण व तिचा प्रियकर शेगावला गेले. 

या ठिकाणी जाऊन कुणाल ने तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर ते नागपूर मध्ये आले. तरीही तो तरुणीवर आत्याचार  करत होता. थोड्या दिवसांनी पीडित  तरुणीने कुणालला लग्नाबद्दल विचारले असता. तो तिला घरी घेऊन गेला. कुणालच्या आई वडिलांनी दोघांच्या लग्नाला संमती दिली. काही दिवसांनी तरुणीला असे समजले की कुणालचे एका  दुसऱ्याच  तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत आणि  कुणाल त्या तरुणीसोबत लग्न ही  करणार आहे. 

अशी माहिती पीडित तरुणीला समजली पीडित तरुणीने कुणालशी संपर्क साधला असता कुणाल ने पीडित तरुणीला लग्नास  नकार दिला  व तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणीने ती राहत असलेल्या ठिकाणच्या नजीक असणाऱ्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली. लग्नाचे आमिष दाखवून फसवणाऱ्या व तरुणीवर आत्याचार  करणाऱ्या  कुणाल व त्याचे आई वडील यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल झालेला आहे. कुणाल किशोर सावरकर ,त्याचे वडील किशोर सावरकर व त्याची आई मीना सावरकर  अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे  आहेत.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News