तरुणाने अमित शहाच भाषण थांबवल आणि म्हणाला...

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा-यिनबझ)
Thursday, 30 January 2020

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रॅली शनिवारी बाबरपूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत निघाली होती. यावेळी "नागरिकत्व सुधारणा विधेयक वापस घ्या !" म्हणणाऱ्या तरुणाला अमित शाह समर्थकांनी चांगलाच चोप दिला.

नागिरकांच्या गर्दीने भरलेलं मैदान आणि नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे फायदे सांगणारा एक आवाज सर्वत्र घुमत होता. तेवढ्यात नागरिकांच्या गर्दीतून 20 वर्षीय तरुणाने सिंहासारखी गर्जना करत आवाज दिला "मंत्री मोहदय नागरिकत्व सुधारणा विधेयक वापस घ्या!, वापस घ्या!" यामुळे सर्वांचे लक्ष तरुणाने वेधुन घेतले. दिल्ली विधानसभा निवडणुकीची रॅली शनिवारी बाबरपूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत निघाली होती. यावेळी "नागरिकत्व सुधारणा विधेयक वापस घ्या !" म्हणणाऱ्या तरुणाला अमित शाह समर्थकांनी चांगलाच चोप दिला.    

CAA विरोधात गैरसमज दूर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 'आत्यारामुळे स्वत:चा देश सोडून भारतात स्थालांतरीत झालेल्या लोकांसाठी नागरिकत्व सुधारणा विधेयक आहे. मात्र, राजकारण करण्यासाठी काही लोक CAAचा विरोध करत आहेत. दिल्लीच्या नागरिकांनी कमळावर जोरात बटन दाबा, त्याचा आवाज शाहीन बाग पर्यंत गेला पाहीजे'. सर्वांचे लक्ष अमित शाह यांच्या भाषणाकडे लागले असताना 20 वर्षीय तरुण हरजीत सिंह म्हणाला की, "नागरिकत्व सुधारणा विधेयक वापस घ्या! वापस घ्या!" यामुळे हरजीत सिंहने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

समर्थकांनी तरुणाला दिला चोप

हरजीत सिंहने CAA विरोध केल्यामुळे अमित शाह समर्थकांचा राग अनावर झाला. लोकांनी तरुणांला धक्काबुक्की केली आणि चांगलाच चोप दिला. हे सर्व गृहमंत्री पाहत होते. त्यानंतर अमित शहाने सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि तरुणाला सोडवण्याचे आदेश पोलिसांना दिले. यामुळे प्रचारसभेत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. शेवटी अमित शहाने "भारत माता की जय" घोषणा देत लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

तरुणाने केला पोलिसांवर आरोप

तरुण हरजीत सिंग म्हणाला की, "मी सीलमपूरा येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालो होतो. मात्र, गृहमंत्री अमित शहा यांची सभा बाबरपूर येथे होणार आहे समजले, CAAला विरोध करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे असा विचार करुन सभेला गेलो. CAAला विरोध केला तेव्हा लोकांनी चोप देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी मला ताब्यात घेतले. पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यायेवजी सरळ पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. 'मी पागल आहे' असे पोलिसांनी जबरदस्तीने माझ्याकडून लिहूण घेतले" असा आरोप तरुणाने केला आहे.

मत व्यक्त करण्याचा आधिकार सर्वांना

दिल्ली विद्यापीठात बी. ए द्वितीय वर्षात शिकत असलेला विद्यार्थी तरुण हरजीत सिंह म्हणाला की, भारतीय संविधानाने सर्वांना आपले मत व्यक्त करण्याचा आधिकार दिला आहे. मी भगतसिंग यांना माणनारा तरुण आहे. माणूसकीच्या नात्याने CAA विरोध केला. मात्र, लोकांनी माझे कपडे फाडले, मारहान केली. पोलिसांनी उपचार करण्यासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी कोठडीत घेऊन गेले हे अमानवीय कृत्या आहे.

पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले

तरुणाने केलेले सर्व आरोप पोलिसांनी फोटाळले आहेत. पोलिस उपआयुक्त देव प्रकाश सुर्या म्हणाले की, तरुणाकडून कोणतेही लेखी पत्र लिहून घेतले नाही. प्रथम चोप देणाऱ्या लोकांपासून तरुणाला पोलिसांनी वाचवले आणि उपचारासाठी थेट रुग्णालयात घेऊन गेले. तरुणाची वैद्यकीय तपासणी करुन कुटुंबीयांना संपर्क केला आणि कुटुबाला तरुण सुपुर्द केला. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News