पोहोण्यासाठी लागलेल्या चुरशीत एका युवकाने गमावला जीव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 August 2020
  • रायगड जिल्हाच्या म्हसळा तालुक्यातील जामसई नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी उलटली असताना तरुणांनी पोहोण्यासाठी लावलेल्या चुरशीत एका युवकाला नदी काठ न गाठता आल्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
  • ह्या पोहोण्याच्या चुरशीत तरुण नदी पात्रात उडी मारतानाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

रायगड जिल्हाच्या म्हसळा तालुक्यातील जामसई नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी उलटली असताना तरुणांनी पोहोण्यासाठी लावलेल्या चुरशीत एका युवकाला नदी काठ न गाठता आल्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ह्या पोहोण्याच्या चुरशीत तरुण नदी पात्रात उडी मारतानाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. या युवकाचे नाव बदर अब्दल्ला हळदे असून तो अवघ्या २३ वर्षांचा होता.

मागील दोन दिवस पडत असलेल्या तुफान पाऊसाने कोकणातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जामसाई नदी देखील पाऊसामुळे तुडुंब भरून वाहत होती यावेळी नदीचे पाणी पाहण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांमधून चार ते पाच तरुणांनी या वाहत्या पाण्यात उड्या घेतल्या. यातील बाकीच्या सर्व तरुणांना वाहत्या नदी पात्रातून काठावर येणे शक्य झाले परंतु बदर ला मात्र हे धाडस फार महागात पडले आणि तो पाण्यासोबत वाहून गेला.

जामसई नदीच्या पुलावर उभे असलेल्या ग्रामस्थांना जेव्हा बदर नदी पात्रात दिसेनासा झाला तेव्हा सर्वांची तारांबळ उडाली. परंतु नदीला पूर असल्याने कोणीही पाण्यात उडी मारून त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्याच्या मृत देहाचा शोध अद्यापही लागलेला नसून जोरदार बरसत असलेल्या पावसामुळे शोध कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News