पोलिसांच्या भीतीने तरूण लपले समुद्रात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020
  • कोरोनाची लागण अधिक लोकांना होऊ नये, यासाठी पोलिस दिवसरात्र आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
  • काहीवेळेला पोलिस समजून सांगत आहेत, तर काहीवेळेला परिस्थिती पाहून सौम्य लाठीचार्ज करावा लागत आहे.

कोरोनाची लागण अधिक लोकांना होऊ नये, यासाठी पोलिस दिवसरात्र आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत. काहीवेळेला पोलिस समजून सांगत आहेत, तर काहीवेळेला परिस्थिती पाहून सौम्य लाठीचार्ज करावा लागत आहे. ही परिस्थिती मागील चार महिन्यांपासून महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचे रूग्ण नसलेल्या परिसरात सरकारने नियम शिथील केले आहेत.
 
पण आज काही तरूण अर्जाळा समुद्राच्या बाजूला क्रिकेट खेळायला गेले होते. तरूण खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिस तात्काळ त्या घटना स्थळावर धाव घेतली. पोलिस आल्याचे पाहताच तरूण जिथे वाट मिळेल तिथे पळत सुटले. काही तरूण कारवाईच्या भीतीने समुद्रात पळाले आणि तिकडे जाऊन लपले. लपून बसलेल्या तरूणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
 
क्रिकेट खेळणार तरूण सकाळी अर्नाळा समुद्र किना-यावर खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस कारवाई करतील या भीतीने तरूण समुद्रात लपले. विरार जवळ असलेल्या अर्नाळा गावात आत्तापर्यंत १४८ रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू सुध्दा झाला आहे. कर्नाळा गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे संपुर्ण गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्याचबरोबर सर्व व्यवहारांना गावात बंदी घालण्यात आली आहे.
 
खेळणारी अधिक मुलं मच्छिमारांची असल्याने त्यांना पोहणं अवघत आहे. त्यामुळे त्यांनी पाण्यात धुम ठोकली असं पोलिसांनी सांगितले. पोहणा-यांनी समुद्रात जाऊन बोटींचा आसरा घेतला. हा सर्व प्रकार व्हिडीओत कैद झाला असून सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पोलिसांना पकडणे शक्य झालेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर इतरांनाही ताब्यात घेऊन कारवाई करू असं पोलिस निरिक्षक महेश शेट्ये यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News