'पबजी' खेळताना तरूणाला हृदयविकाराच्या झटका 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020
  • ऑनलाइन गेम शहरातून आता गावाकडे सरकले आहेत.
  • कारण कोरोनाच्या संसर्गामुळे शहरातील नोकरी मंडळी कुटुंबासहित गावाकडे आहेत.
  • त्यातचं शाळा ऑनलाइन असल्याने मुलं दिवसरात्र मोबाईल मध्ये असल्याचे चित्र आहे.

नांदेड - ऑनलाइन गेम शहरातून आता गावाकडे सरकले आहेत. कारण कोरोनाच्या संसर्गामुळे शहरातील नोकरी मंडळी कुटुंबासहित गावाकडे आहेत. त्यातचं शाळा ऑनलाइन असल्याने मुलं दिवसरात्र मोबाईल मध्ये असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात सुध्दा मोबाईल गेमचे फॅड प्रचंड आहे. पबजी नावाचा गेम खेळत असताना हदयविकाराच्या झटक्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच नांदेड जिल्ह्यात घडली आहे.  

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मौजे मछींद्र पार्डी येथील हा तरूण आहे. या तरूणाचं नाव राजेश नंदू राठोड असं आहे. राजेशला पबजी गेमचं  प्रचंड वेड होतं. तो घराशेजारी पबजी खेळत बसला होता. त्यादरम्यान त्याला हदयविकाराचा झटका आला. तो काहीचं हालचाल होत नसल्याने त्याला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. परंतु डॉक्टरांनी चेक केल्यानंतर मृत झाल्याचे कुटुंबियांना सांगितले. 

पबजी गेम खेळत असताना डीप्रेशन आल्याने त्याला झटका आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर अशा गेमवर सरकाराने बंदी आणायला हवी असंही ग्रामस्त म्हणाले. 

राजेश पबजी गेमच्या इतका आहारी गेला होता, की गावाकडे मोबाईलला नेटवर्क नसल्यानंतर तो झाडावरती तासंनतास बसत होता. कारण झाडावरती रेंच आल्यानंतर तो तिथेच पबजी गेम खेळायला सुरूवात करायचा. नागपंचमीच्या दिवशी ही  घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शोकाकूळ वातावरणात ग्रामस्थानी राजेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News