टिकटॉक व्हिडीओ करण्याच्या नादात तरुण नको त्या ठिकाणी अडकला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020
  • टिकटॉक काढणाऱ्या या तरुणाचे नाव जेसन क्लार्क असं असून त्याने हा व्हिडीओ स्वतः शेअर करून आपला अनुभव सांगितलं आहे. 

अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या टिकटॉकने आजवर अनेक तरुणांना आपली कला सादर करण्याची संधी दिली आहे. भारतात तर टिकटॉकला प्रचंड पसंती आहे. या व्हिडीओ काढण्याच्या सवयीमुळे अनेक टिकटॉक स्टारचे जीव देखील धोक्यात गेले आहेत. प्रसिद्धी मिळविण्यासाठी हे टिकटॉक स्टार कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाहीत, मागे-पुढे पाहत नाहीत.  याचप्रकारे एका तरुणाने टिकटॉकच्या नादात आपला जीव धोक्यात घालविल्याची घटना घडली आहे. 

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. टिकटॉक काढणाऱ्या या तरुणाचे नाव जेसन क्लार्क असं असून त्याने हा व्हिडीओ स्वतः शेअर करून आपला अनुभव सांगितलं आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I have never been this close to dying. I didn’t think my eyeballs would freeze so quick. The surface of the water where the hole was didn’t look any different than the bottom of the ice. When I flipped around and felt solid ice I thought I was at the hole. When I wasn’t that’s when I decided to head back and follow the dust I kicked up. The dust I kicked up had drifted and led me further away. I then tried to break the ice with my back, you can see in the video. I don’t know what made me turn around one last time. I was so short on breath I couldn’t really see anymore. I had accepted that was it and I wasn’t going to make it. I swung my hand at what I though was just a lighter spot of ice and my hand came through. I then got a ton of energy to stand up. It took 2-3 breaths to regain my vision after resurfacing. Aftermath is in the other video. : @abbytodolist was filming. When there are scary moments I joke a lot. She genuinely thought it was another one of my jokes and didn’t recognize the severity of the situation.

A post shared by Jason Clark (@jasontodolist) on

या व्हिडिओमध्ये हा तरुण बर्फ जमलेल्या पाण्यात उतरला आहे. त्या पाण्यात तो पोहण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अल्पावधीतच त्याला बाहेर निघण्यासाठी रस्ता सापडत नाही. तो जीव वाचविण्यासाठी हाताने बर्फ फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील दिसत आहे. मात्र पूर्ण जीव ओतून त्याने प्रयत्न केल्यानंतर अखेर तो त्यातून बाहेर येतो.  

हा आपला अनुभव त्याने व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे. मृत्यूच्या एवढ्या जवळ मी कधीच नव्हतो, पाण्यामधून बर्फाबाबत काहीच अंदाज येत नव्हता. या अनुभवासह त्याने शेअर केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत २१ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यू मिळाले आहेत. त्यासोबतच तब्ब्ल १.६ लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पहिला आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

You have to try it twice! Added a little more safety. The exit hole is almost comically big.

A post shared by Jason Clark (@jasontodolist) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News