१० सेकंदात तरूणाने सोडले प्राण, व्हिडीओ होतोय व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020

रस्ता अरूंद असल्याने चालकाला गाडी कंट्रोल झाली नसावी असं पोलिसांनी सांगितले.

१० सेकंदात तरूणाने सोडले प्राण, व्हिडीओ होतोय व्हायरल

औरंगाबाद - सोशल मीडियाच्या माध्यमातून सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेले व्हिडीओ आपण असतो, त्याचबरोबर ते इतरांना शेअर सुध्दा करत असतो. अशी नुकतीच औरंगाबाद घडली असून चालत असलेल्या तरूणाला ट्रकने रस्त्यावर चिडले आणि क्षणार्दात त्याचा मृत्यू झाला. ही घटना तिथल्या सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नागरिक आच्छर्य व्यक्त करत आहेत.

मृत झालेल्या तरूणाचे नाव रस्तुम लक्ष्मण राजुळे असून तो रस्त्याने चालत असताना मागून आलेल्या ट्रॅकने त्याला चिरडले. काही क्षणात त्याचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या सेकंदात होत्याच नव्हतं झाल्याचा व्हिडीओ सीसीटिव्हीत कैद झाला.

हा तरूण सकाळी बॅंकेतील कामासाठी रस्त्याने निघाला होता. तेवढ्यात मागून आलेल्या ट्रॅकने त्याला चिरडले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. रस्ता अरूंद असल्याने चालकाला गाडी कंट्रोल झाली नसावी असं पोलिसांनी सांगितले. ही औरंगाबाद मधील वाळूज परिसरात घडली असून पोलिस ट्रॅक चालकाचा शोध घेत आहेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News