पुण्यात एकतर्फी प्रेमप्रकरणाचा थरार, शेवटी झालं असं...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020

अरविंद अधिक त्रास देत असल्याने विवाहीत महिलेने हे प्रकरण पतीच्या कानावर घातलं. त्यानंतर महिलेच्या पतीनं अरविंदला समजावून सांगितलं. पण अरविंद सुधारत नसल्याने महिलेने मोबाईल नंबर बदलला. त्यामुळे अरविंद अधिक संपातला. 

पुण्यात एकतर्फी प्रेमप्रकरणाचा थरार, शेवटी झालं असं...

पुणे - पिंपरी चिंचवड परिसरात एका विवाहीत तरूणाने एका विवाहीत महिलेची एकतर्फी प्रेमप्रकरणातून चाकूने भोकसून हत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. महिलेचा खून झाल्यानंतर तरूणाने स्वत: ला चाकू मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चिखली परिसरात हत्या झाल्याने घबराहट पसरली आहे. भररस्त्यात विवाहीत तरूणीला चाकू मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर तरूणाने स्वत: ला चाकू मारून घेतल्याने तो गंभीर जखमी असल्याचे माहिती चिखली पोलिसांनी दिली. 

अरविंद शेषेराव गाडे (वय ३०) असं आरोपीचं नाव आहे. अरविंदचं विवाहीत महिलेवर एकतर्फी प्रेम होतं. दरम्यान मृत महिलेला तीन मुलं असून आरोपी सुध्दा दोन मुलं आहेत. अनेक महिन्यांपासून अरविंदचं या महिलेवर एकतर्फी प्रेम होतं. अरविंदनं अनेकदा त्याच्या मनातलं प्रेम महिलेला बोलून दाखवलं होतं. त्याचबरोबर मोबाईलवरून सुध्दा अनेकदा अरविंदनं महिलेला त्रास दिला होता. 

अरविंद अधिक त्रास देत असल्याने विवाहीत महिलेने हे प्रकरण पतीच्या कानावर घातलं. त्यानंतर महिलेच्या पतीनं अरविंदला समजावून सांगितलं. पण अरविंद सुधारत नसल्याने महिलेने मोबाईल नंबर बदलला. त्यामुळे अरविंद अधिक संपातला. 

विवाहीत महिला कामावरून दुपारी घरी जात असताना आरोपीने तिला अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वादावादी झाली आणि अरविंदनं सोबत आणलेला चाकू महिलेच्या शरिरात घुसवला. चाकूने अनेक वार केल्यानंतर महिलेचा जाग्यावरचं मृत्यू झाला. त्यानंतर अरविंदनं स्वत: ला चाकू मारल्याने तो सुध्दा गंभीर जखमी झाला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरिक्षक सतिश माने करीत आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News