अभ्यासावरुन वडील रागावल्याने तरूणाने केले 'हे' कृत्य 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020

गुरूवारी बाप-लेकाचं कडाक्याचं भांडण झालं. चिडलेल्या माणिकने घरात कोणी नसल्याचे पाहून वडिलांच्या लायसन्स बंदूक मधून आपल्या छातीत गोळी झाडून आत्महत्या केली.

अभ्यासावरुन वडील रागावल्याने तरूणाने केले 'हे' कृत्य 

पंजाब - प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासात प्रगती करावी असं प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटतं असतं, परंतु पंजाबमध्ये वडील मुलाला अभ्यासाच्या कारणावरून ओरडल्याने २० वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पंजाब मधील जालंधर परिसरात ही घटना घडली असून परिसरात घबराहट पसरली आहे. 

मुलाचं नाव माणिक शर्मा असं असून त्याचे वडील चंद्रशेखर शर्मा हे मेडिकलचं दुकान चालवतात. त्याचबरोबर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. माणिक हा तिथल्या कॉलेजमध्ये 'बीबीए'चं शिक्षण घेतं होता. सतत मोबाईलवरती वेळ घालवत असल्याने वडीलांची चिडचिड होत होती. त्यात माणिकला पबजी खेळाचं प्रचंड वेड होतं. परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने वडिल त्याला सतत अभ्यासात लक्ष घालं असं म्हणतं होते. 

गुरूवारी बाप-लेकाचं कडाक्याचं भांडण झालं. चिडलेल्या माणिकने घरात कोणी नसल्याचे पाहून वडिलांच्या लायसन्स बंदूक मधून आपल्या छातीत गोळी झाडून आत्महत्या केली. माणिकने मृत्यपूर्वी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये मी प्रचंड वाईट आहे मजकूर लिहिला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

गेल्या अनेक महिन्यांपासून तो सतत मोबाईलवरती रेंगाळलेला असायचा. त्यामुळे त्याला अभ्यासात कमी गुण सुध्दा मिळाले होते. त्याचं आयुष्य चांगलं असाव यासाठी मी त्याला चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवं असा सल्ला देत होतो. एकदा त्याने आपला मोबाईल रागाच्या भरात फोडला होता अशी माहिती चंद्रशेखर यांनी सांगितली. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News