कोरोनाच्या भीतीने तरूणाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020
  • मागील चार महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. ताप, सर्दी, खोकला झाल्यानंतर सुध्दा नागरिक घाबरत असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात आहे.
  • कोरोनाच्या भीतीने स्वत:ला क्वारंटाइन केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

गेवराई - मागील चार महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. ताप, सर्दी, खोकला झाल्यानंतर सुध्दा नागरिक घाबरत असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात आहे. कोरोनाच्या भीतीने स्वत:ला क्वारंटाइन केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे तरूणाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. तरीही त्याने आत्महत्येचं पाऊल उचलल्याने परिसरात घबराहट पसरली आहे. 

प्रकाश बाळकृष्ण गायकवाड असं मृत तरूणाचे आहे. हा पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढल्यापासून तो भयभीत झाला होता. तसेच शहरातील अहिल्या नगर भागात मागील तीन महिन्यांपासून राहायला होता. आजारी असल्याने त्याची कोरोना चाचणी करण्याचं डॉक्टरांनी ठरवलं होतं. त्यासाठी त्याचा स्वॅब घेतला होता. तसेच त्याचा रिपोर्टही निगेटिव्ह आला होता. 

परंतु कोरोनाची धास्ती घेतलेल्या तरूणाने स्वत:ला कोंडून घेतले होते. त्याला कोरोना झाला आहे असं वाटतं होते. शनिवारी पाहटे ५ च्या सुमाराम अति घाबरलेल्या तरूणाने राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने हाताच्या दोन्ही नसा सुध्दा कापल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या प्रकरणाची अधिक माहिती गेवराई पोलिस करीत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News