आजोेबांच तरुणपण

पराग पिंगळे
Thursday, 20 June 2019

राहिलेल्या केसांना करतो काळे
विस्मरणाने आता नाही भान,
शरीर थकले ,गुढगे दुखतायेत
पण मन अमुचे हिरवे पान ।।

राहिलेल्या केसांना करतो काळे
विस्मरणाने आता नाही भान,
शरीर थकले ,गुढगे दुखतायेत
पण मन अमुचे हिरवे पान ।।

दात दुखी पण हास्य मुखी
आता कंबर अकडते भारी,
टकल्यावरून हात फिरवत
नजर चौफेर जाते सारी,
म्हणे काका, कुणी आजोबा 
आता शरीरात नाही जान,
शरीर थकले ,गुढगे दुखतायेत
पण मन अमुचे हिरवे पान ।।

सकाळच्या आणि रात्रीच्या
गोळ्यांनी झालो आम्ही बेजार,
हृदय रोग आणि मधुमेह असूनही
विचार बेभान मनावर स्वार,
सांभाळून चाला या उपदेशाने
होतोय वारंवार अमुचा अवमान,
शरीर थकले ,गुढगे दुखतायेत
पण मन अमुचे हिरवे पान ।।

रममाण होतो जुन्या आठवणीत
आठवणीत आणि स्वप्नात ती येते,
तिच्या प्राप्तीच्या जुन्या आठवणींनी
ती भलतीच त्रास आम्हाला देते,
तिच्या संसारात ती असेल सुखी
आमुची अलिप्त राहण्यातच शान,
शरीर थकले ,गुढगे दुखतायेत
पण मन अमुचे हिरवे पान ।।

एकदा हिम्मत करून केला फोन
तिला अगदी दुपारच्या वेळी,
विचार केला तिचा आवाज ऐकू
उत्साह पोहोचला आभाळी,
फोन उचलला तिच्या मुलीने
केले मामा म्हणून बेजान,
शरीर थकले ,गुढगे दुखतायेत
पण मन अमुचे हिरवे पान ।।

हातात काठी,आलीय साठी
पण मनात तारुण्यातील भेटी,
वर्षानुवर्षे आठवणीत आमुच्या
नाजूक नात्यांच्या त्या गाठी,
हटकुनी कधी बेजार करतात
आम्ही केलेल्या इच्छा म्यान,
शरीर थकले ,गुढगे दुखतायेत
पण मन अमुचे हिरवे पान ।।

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News