तरुणींने काढला मॅचींगचा फंडा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 7 October 2019

तुमची आवडती ज्वेलरी ज्या ड्रेसवर घालायची आहे, त्या रंगाच्या नेलपेंटने ही ज्वेलरी रंगवल्यास ती तुम्हाला सहज घालता येईल. त्याचबरोबर मॅचिंगचा प्रश्‍नही सुटेल.

आपण अनेकदा दागिन्यांची खरेदी करतो. काही वेळा ते कशावर मॅच होतील की नाही हे न पाहताच खरेदी करतो. पण नंतर हे दागिने नेमके कशावर मॅच होतील, असा प्रश्‍न पडतो. यासाठी नेलपेंट हा उत्तम उपाय आहे.

तुमची आवडती ज्वेलरी ज्या ड्रेसवर घालायची आहे, त्या रंगाच्या नेलपेंटने ही ज्वेलरी रंगवल्यास ती तुम्हाला सहज घालता येईल. त्याचबरोबर मॅचिंगचा प्रश्‍नही सुटेल. दागिने रंगविण्यासाठी जे नेलपेंट वापरावे लागते, ते चांगल्या दर्जाचे असावे. नेलपेंटचा थर देताना सर्वप्रथम दागिन्यांच्या एका बाजूला छोटासा स्पॉट रंगवावा. रंगसंगती आकर्षक वाटली, पेंट योग्य प्रकारे बसतोय असे वाटले, तरच संपूर्ण दागिना नेलपेंटने रंगवा. 

वेढणीच्या बांगड्या, अंगठ्या, अँकलेट्स, पैंजण आदी दागिन्यांवर हा प्रयोग करता येऊ शकेल. शक्यतो नेकलेसच्या मधल्या पदरावर हलक्या हाताने पेंटिंगचे काम करा. नेल रिमूव्हरचा उपयोग करून नको असणारा नेलपेंट दागिन्यांपासून काढता येतो. अडगळीत पडलेल्या दागिन्यांवरही हा प्रयोग करून ते पुन्हा वापरात येऊ शकतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News