नोकरीनंतर पहिला गाडी घ्यावी की घर; असं ठरवा

यिनबझ टीम
Monday, 23 December 2019

प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर, एक कार आणि नंतर मूलभूत सुविधांचे स्वप्न असते. परंतु प्रथम घर किंवा गाडी असावी, या निर्णयाविषयी तरुणांमध्ये संभ्रम असतो, हे एका सर्वेमधून समोर आलं आहे.

खरं तर, तरुण वर्ग नोकरी मिळताच भविष्यात घर आणि कारची स्वप्ने पाहण्यास सुरुवात करतात. परंतु या दोघांपैकी काय आवश्यक आहे, याचा निर्णय घेताना बरेच वेळा तरुण चुकीचे निर्णय घेतात, ज्याचा थेट परिणाम भविष्यातील अनेक योजनांवर होतो.

बरेचदा असं दिसून येते की चांगला पगार असल्याने घर आणि कार या दोन्ही गोष्टी एकत्र घेण्याचे ठरविले जाते, परंतु आपण हे निर्णय सेव्हिंग पैशाच्या जोरावर घेतल्यास ते सर्वात चुकीचे पाऊल समजले जाईल, त्यामुळे सावधान!

तज्ञांच्या मते, पगारावर नाही, तर आपण काम काय करतो, यावर असे निर्णय घेणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, जर कार्यालय राहत्या ठिकाणापासून दूर नसेल आणि सार्वजनिक वाहतुकीची सुविधा चांगली असेल तर अशा परिस्थितीत प्रथम घर घेण्याबद्दल विचार केला पाहिजे, कारण घर घेणे ही एकप्रकारची गुंतवणूक समजली जाते.

जर समजा आपण पहिल्यांदा घर घेतले असेल तर ती आपण मोठी गुंतवणूक केली आहे, असच समजावं लागेल, कारण घराच्या किंमती वर्षानुवर्षे वाढतील आणि त्या घरात बसून आपण मोठे निर्णय घेऊ शकतो. परंतु अशा परिस्थितीत आपण पहिला गाडी घेतल्यास तो सेव्हिंगचा मार्ग ठरू शकणार नाही, कारण शोरूम सोडताच वाहनाची किंमत कमी होते, म्हणजेच, कार खरेदी करणे कधीही गुंतवणूक मानले जात नाही.

याबरोबर आणखी एक गोष्ट अशी की, जर घर आणि ऑफिसमधील अंतर जास्त असेल आणि एखाद्यावेळेस मीटिंगसाठी किंवा काही कामासाठी लांबचा प्रवास करावा लागला असेल तर अशा परिस्थितीत घराआधी कार घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News