युवा पिढी स्टाईलच्या नादात अडकतेय सिगारेटच्या विळख्यात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

जागतिक तंबाखू विरोधी दिन आज विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मौखिक आरोग्य) डॉ. विजया जगताप यांच्याशी संवाद साधला. डॉ. जगताप म्हणाल्या, सिगारेट के धुएँ का छल्ला बना के जाने क्‍या होगा रामा रे...

जागतिक तंबाखू विरोधी दिन आज विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मौखिक आरोग्य) डॉ. विजया जगताप यांच्याशी संवाद साधला. डॉ. जगताप म्हणाल्या, सिगारेट के धुएँ का छल्ला बना के जाने क्‍या होगा रामा रे...

अतिशय गाजलेल्या या गाण्याप्रमाणे आजकालची तरुण पिढी त्याचे अनुकरण करून स्टाईल मारण्याच्या हेतूने सिगारेटच्या विळख्यात अडकताना दिसत आहेत. स्टाईल मारण्याच्या नादात सिगारेटच्या धुराचे कधी व्यसनात रुपांतर होईल हे त्यांचे त्यांना समजतही नाही.

या व्यसनामुळे होणारा आरोग्यावर दुष्परिणाम म्हणजे कर्करोग. आपणच आपल्या अंगावर ओढवून घेतो तो वेदनादायी मृत्यू. आणि मग सोचा नाही था तकदीर यहॉं लाएगी मंजिल पे आते ही जान चली जाएगी, असे म्हणायची वेळ तरुण पिढीवर येऊ नये, हीच कळकळीची विनंती. अतिरेक करत नाही. पण, दुर्दैवाने हेच सत्य आहे.

31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी देखील एक थीम दिलेली आहे, ती म्हणजे तंबाखू व फुफ्फुसाचे आरोग्य (Tobacco and Lung Health). तसेच तंबाखू सेवनामुळे मौखिक, घशाचा, फुफ्फुसांचा कर्करोग, स्ट्रोक, हार्ट ऍटॅक असे जीवघेणे आजार उद्धभवतात. भारतामध्ये सर्वसाधारणपणे दिवसाला 3500 मृत्यू तंबाखू सेवनामुळे होतात. GATS (Global Adult Tobacco Survey) नुसार भारतामध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण हे सहा टक्‍केने कमी झालेले आहे, तर महाराष्ट्रामध्ये स्मोकिंगचे 2.8 टक्‍के तर smockless tobacco 3.2 टक्‍केने महत्त्वपूर्णरित्या कमी झाले आहे. तंबाखूचे सेवन हे भारतातील उत्तरपूर्व राज्यामध्ये म्हणजे मिझोराम, मेघालय, त्रिपुरा येथे खूप जास्त आहे.

सातारा जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. उज्वला माने यांच्या मार्गदर्शनखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम राबवले जातात. यामध्ये शाळा व सरकारी कार्यालये तंबाखूमुक्त करणे, धुम्रपान केल्यास दंड आकारणे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे, मौखिक आरोग्य तपासणी शिबिरे घेणे, तंबाखू समुपदेशन केंद्र चालवणे, मौखिक कर्करोग निदान व उपचार करणे, जनजागृतीपर आरोग्य विषय व्याख्याने देणे, प्रभातफेरी काढणे इत्यादी कार्यक्रम राबवले जातात. "संस्कार संस्कृती विसरू नको, तंबाखूसाठी हात पसरू नको.', असे सल्लाही जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मौखिक आरोग्य) डॉ. विजया जगताप यांनी दिला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News