युवा पिढी संविधानाच्या तत्वावर चालण्यासाठी सक्षम: रोहीत पवार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 February 2020

रयत शिक्षण संस्था संचालित 'महात्मा गांधी माध्यमिक, उच्चमाध्यमिक व तांत्रिक विद्यालय' आणि माजी विद्यार्थी संघ 'आस्था' याच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.12) आमदार रोहीत पवार यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केले

नगर: 'समाज कंठक संविधान बदलण्याची भाषा करतात मात्र, संविधान बदलण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्याला यश येणार नाही कारण आजची युवा पिढी संविधानाच्या तत्वावर चालण्यासाठी सक्षम आहे' असा विश्वास कर्जत- जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केला.

रयत शिक्षण संस्था संचालित 'महात्मा गांधी माध्यमिक, उच्चमाध्यमिक व तांत्रिक विद्यालय' आणि माजी विद्यार्थी संघ 'आस्था' याच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.12) आमदार रोहीत पवार यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केले. 

'रयत शिक्षण संस्थे'च्या प्रत्येक शाळेशी आदरणीय शरद पवार साहेबांपासून माझ्यापर्यंत संपूर्ण कुटुंबाचा घनिष्ठ स्नेहबंध आहेत. संस्थेने केलेल्या सत्काराचा मी ऋणी आहे. निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांची शक्ती माझ्यासोबत होती आज मी त्यांच्यासोबत आहे आणि यापुढंही नेहमीच आम्ही एकमेकांसोबत राहू' असा विश्वास आमदार पवार यांनी व्यक्त केला. 

यावोळी प्राचार्य खेतमाळीस सर, 'आस्था'चे अध्यक्ष अॅड. नितीन गवारे, खजिनदार नितीन देशमुख, सचिव नितीन गलगटे, अतुल कदम, राजळे सर, श्रीकांत तोरडमल यांच्यासह संस्थेतील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. संविधानावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. उत्कृष्ठ वक्तृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना आमदार रोहीत पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News