तरुण दिग्दर्शकाच्या रोमांचकारी प्रवासातून प्रेक्षकांसमोर येतेय ‘कॉलेज डायरी’

यीनबझ ऑनलाईन टिम
Saturday, 9 February 2019

आपली ध्येय… आपली जिद्द… आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा दुर्दम्य आशावाद असतो तो स्वप्नांत. ही वेडी आशा आपल्याला पछाडून सोडते आणि मग सुरु होतो एक धाडसी प्रवास. अनिकेत जगन्नाथ घाडगे या तरुण दिग्दर्शकानेही असाच काहीसा रोमांचकारी प्रवास अनुभवला तो ‘कॉलेज डायरी’ या मराठी चित्रपटाच्यानिमित्ताने. भावेश काशियानी फिल्म्स,आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत ‘कॉलेज डायरी’ १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

अनिकेत जगन्नाथ घाडगे या तरुण दिग्दर्शकाने आपल्या स्वप्नांची गाथा मांडत काहीसा रोमांचकारी प्रवास अनुभवला तो 'कॉलेज डायरी' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने. भावेश काशियानी फिल्म्स, आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत 'कॉलेज डायरी' 16 फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

मनोरंजन क्षेत्रात आपले नाणे खणखणीत वाजवण्यासाठी प्रत्येक कलावंत तळमळत असतो. अनिकेतही त्यातलाच एक, पण अंगीभूत गुण-कौशल्य आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. 'कॉलेज डायरी' या चित्रपटाचे शूटींग करताना अनिकेतच्या पाठीला दुखापत झाली होती व प्रसंगी आई-बहिणींचे दागिने गहाण ठेवत कधी व्याजावर पैसे घेत त्याने या चित्रपटासाठी निर्माते भावेश काशियानी यांनाही पाठिंबा दिला. चित्रपटाच्या निर्मात्याने ऐनवेळी माघार घेतली. अशा अडचणी येऊनही अनिकेतने शूटींगमध्ये खंड पडू दिला नाही. आता चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

'कॉलेज डायरी'ची कथा ही कॅम्पसमध्ये घडते. कॉलेज म्हणजे केवळ मजा-मस्ती-धम्माल असे मानणाऱ्या काही मित्रांच्या आयुष्यात अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनांभोवती फेर धरणारी अनिकेतची कथा खिळवून ठेवणारी आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते सचिन दूबाले पाटील असून विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतीक्षा शिवणकर, अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे, शिवराज चव्हाण,शुभम राऊत, हेमलता रघू, जनार्दन कदम आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'कॉलेज डायरी'मध्ये मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश आणि तामिळ अशा पाच भाषांतील गाणी आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News