आमच्या नजरेतील तरुण

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 29 January 2019

मित्रांनो, लग्न म्हटलं की सगळ्यात आधी विषय गाजतो तो म्हणजे प्री वेड्डींग शूटचा. वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन मनमुरादपणे आपल्याला हव्या त्या पोजमध्ये फोटो काढणं आणि सोशल मीडियावर शेअर करणं, ही आता तरूणांमध्ये क्रेझ बनली आहे. अशाच तरूण आणि तरूणींना मात देणारे एक नांदेडचे कपल आज सोशल मीडियावर एकदम गाजतय, ते म्हणजे प्रताप धरमसी आणि त्यांच्या पत्नी. या जोडप्याने आपल्या लग्नाच्या पन्नास वर्षांच सेलिब्रेशन परदेशात साजरं केलं.

       सध्याच त्यांच्या लग्नाची हाफ सेंचूरी पूर्ण झाली. त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले फोटोशूट अगदी तरूण पिढीला देखील लाजवेल असच आहे. रोमियो जुलेट, प्रिंस अॅंड प्रिंसेस, अशा आणि अनेक पोजमध्ये फोटोशूट करून या दिमाखदार जोडीने आपले सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मग काय! या गोड कपलला सोशल मीडियावरूनही शूभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.वयाची हाफ सेंचूरी ओलांडून देखील आपल्या लाईफ पार्ट्नरसोबत आयूष्याची मौज करण्याचा आनंद यांच्या अॅनिवर्सरी शूटच्या वेळी दिसून आला. आयूष्यात भांडण तंटा सुरूच असतो, गरज आहे ती म्हणजे एकमेकांना समजून घेण्याची, हा आदर्श त्यांनी आपल्या फोटोशूटच्या माध्यमातून नव्या तरूणपिढीसमोर ठेवला. त्यांच्या या बोल्ड संसाराला बोल्ड फोटोशूट प्रमाणेच यीनबझच्या टीमकडून शूभेच्छा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News