चक्क लग्नपत्रिकेतून तरुणाने दिला CAA-NRC ला पाठिंबा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020

मध्यप्रदेश : देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून वाद सुरु आहे. अनेकठिकाणी मोर्चे निघाले आहेत. या कायद्याच्या विरोधात निदर्शने होत असताना दुसरीकडे या कायद्याला पाठिंबा देणारी देखील मोठी फळी देशात निर्माण झाली आहे. प्रत्येकजण आपल्यापरीने या कायद्याला पाठिंबा देत आहे. काही ठिकाणी या कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येत आहेत. यामध्ये तरुणांचा सहभाग सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.  एका तरुणाने चक्क आपल्या लग्नपत्रिकेत CAA-NRC ला पाठिंबा दिला आहे. 

मध्यप्रदेशातील नरसिंगपूर येथील एका तरूणाने आपल्या लग्नपत्रिकेवर चक्क CAA-NRC ला पाठिंबा असल्याचे छापले आहे. या तरुणाचे नाव प्रभात असं आहे. लोकांमध्ये नागरिकत्व कायद्याबाबत जागृती निर्माण व्हावी, यासाठी लग्नपत्रिकेवर "We support CAA and NRC" हा संदेश छापला आहे. मोहित मिश्रा आणि सोनम पाठक यांचा देखील विवाह पुढील महिन्यात आहे. या दोघांनीही आपल्या लग्नपत्रिकेत We support CAA and NRC असं लिहिलं आहे. 

सध्या देशात या कायद्यावर मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण होत आहे. त्यामुळे याबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने जरी याबाबत विचार केला, तरी मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण होते. देशातील प्रत्येक तरुणाने या गोष्टींचा आदर्श घेऊन काम केलं पाहिजे, असं देखील यावेळी त्याने सांगितले.  

 दरम्यान एकीकडे तरुणाई वेगवेगळ्या पद्धतीने CAA and NRC ला पाठिंबा देत असताना या कायदयाच्याविरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला अनेक मुस्लिम संघटना देखील पाठिंबा देणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News