लग्नासाठी एकच अट..! बायको १०० किलो वजनाची हवी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 January 2020
  • एका इसमाला लग्नासाठी बायको हवी आहे. मात्र या तरुणाची अनोखी अपेक्षा आहे.
  • या तरुणाला १०० किलो वजनाची बायको हवी आहे.

पाकिस्तान : लग्नासाठी मुलगी पाहताना मुलगी सुंदर हवी, सुशिक्षित हवी, चांगलं जेवण बनविणारी हवी तसेच  मुलांच्या अनेक अपेक्षा असतात. पाकिस्तानमधील एका इसमाला लग्नासाठी बायको हवी आहे. मात्र या तरुणाची अनोखी अपेक्षा आहे. या तरुणाला १०० किलो वजनाची बायको हवी आहे.

हयात अरबाब खिजर असं या २७ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वजन अवाढव्य असल्याने त्याला लग्नासाठी अनेक अडचणी येत आहेत. खिजर याचे सध्याचे वजन ४४४ किलो आहे. त्यामुळे किमान १०० किलो वजनाची बायको मिळावी एवढीच अपेक्षा या तरुणाची आहे. 

हयातच्या घरच्यांनी देखील याबाबत हेच मत मांडले. खिजरचे वय ४४४ किलो असल्याने बायकोचे वय १०० किलो असणं आवश्यक आहे. तरच त्या दोघांची जोडी शोभून दिसेल. हयात यांची उंची ६.६ फूट आहे. तसेच त्याचे रोजचे जेवण देखील अवाढव्य आहे.  

त्याला रोज नाश्त्यात ३०-४० अंडी खातो. यासोबतच त्याच्या बायकोला चांगले जेवण बनवता आले पाहिजे, अशी देखील अपेक्षा त्याच्या कुटुंबीयांच्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्यासाठी मुलींचा शोध सुरु आहे, मात्र मनासारखी आणि वजनात न बसणारी मुलगी सापडत नसल्याने तो अजून अविवाहित आहे. हयात याची पाकिस्तानमध्ये एक वेगळी ओळख आहे. त्याच्या वजनामुळे तो अनेकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News