तरुण अभिनेता मोहित बघेलचा कर्करोगामुळे मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 24 May 2020
  •  रुग्णालयाने दाखल करण्यास दिला नकार  

मुंबई : कोरोनामुळे 2020 हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी खूपच वाईट आणि वेदनादायक ठरत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, इरफान खान आणि ऋषी कपूर या ज्येष्ठ अभिनेत्यांनंतर मोहित बघेल (27) या तरुण अभिनेत्याचाही कर्करोगाने बळी घेतला आहे.

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे आई-वडील आणि मोठ्या भावासोबत राहणाऱ्या मोहित बघेल याने सलमान खानच्या 'रेडी' या चित्रपटात अमर चौधरी ही व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. सलमान खानच्याच 'जय हो' या चित्रपटातही त्याने काम केले होते. सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणती चोप्रा यांच्या 'जबरिया जोडी' या चित्रपटातही त्याने धमाल उडवली होती. त्याचा कॉमिक सेन्स अफलातून होता आणि विशेष अभिनयशैलीवर प्रेक्षक फिदा होते. सध्या तो "बंटी और बबली-2' मध्ये काम करत होता.

काही वर्षे कर्करोगाने आजारी असलेल्या मोहितवर 14 मे रोजी केमोथेरपी करण्यात आली होती. त्यानंतर त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. प्रकृती बिघडल्यामुळे त्याला नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले; परंतु रुग्णालयाने त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर शनिवारी सकाळी 11 वाजता त्याने या जगाचा निरोप घेतला. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि लेखक राज शांडिल्य यांनी ट्विटरवरून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News