तू परत येशील...

सुनिल पवार
Wednesday, 19 June 2019

स्पर्शून किनाऱ्यास
लाटे कुठवर जाशील..?

स्पर्शून किनाऱ्यास
लाटे कुठवर जाशील..?
ओलावा मम मनातला
सांग कसा तू नेशील..!!

मन सागरात उगाचच
किती वेळ घुटमळशील
जितकी दूर जाशील
तितकी अधिक तळमळशील..!!

आज जरी ओहटीत तू
उद्या भरतीत असशील..
इतके मात्र निश्चित
तू परत किनारी येशील..!!
 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News