दिशा पटानीचा वर्कआउट पाहून व्हाल थक्क; 60 किलो वजन घेऊन करते व्यायाम, पाहा व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 25 September 2020

दिशाने तब्बल दहा वेळा 60 किलो वजन घेऊन बैठका काढल्या. दिशाची हिम्मत पाहून तरुणाईत एक नवी उर्जा निर्माण होत आहे.

दिवसेंदिवस आकर्षक शरीर बनवण्यासाठी तरुणाई कठोर मेहनत घेत आहे. यात बॉलिवूडचे अभिनेते आग्रस्थानी आहेत. मात्र, बॉलिवूडच्या अभिनेत्याही आता मागे राहिल्या नाहीत, अभिनेच्याप्रमाणे अभिनेत्रिंनी आता कठोर मेहनत घेण्यास सुरुवात केली, बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पठाणी यांनी 60 किलो वजन खांद्यावर घेऊन वर्कआउट करताना दिसली. वर्काआउट करण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, व्हिडिओला 25 लाखांपेक्षा अधिक चहात्यांनी लाईक केले, तर दिशाच्या हिम्मतीला अनेकांनी कमेंट्स दिले, त्यामुळे दिशा चर्चेचा विषय बनली आहे. 

 

दिशाचे 4 करोड पैक्षा अधिक फॉलोर्स इन्स्टाग्रामवर आहेत. नुकताच दिशाने वर्कआउट करणारा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम सोशल मीडियावर शेअर केला. त्या व्हिडीओ खाली एक कॉप्शन लिहले, '40 मिलियन, 60 किलो वजन, हे सगळं शक्य झालं ते माझ्या चहात्यांमुळे, धन्यवाद! असे म्हटले आहे. दिशा 60 किलो वजन घेऊन वर्कआऊट करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. दिशाने तब्बल दहा वेळा 60 किलो वजन घेऊन बैठका काढल्या. दिशाची हिम्मत पाहून तरुणाईत एक नवी उर्जा निर्माण होत आहे. कलाकार होण्यासाठी किती कठोर मेहनत करावी लागले याची परिचिती दिशाकडे पहिल्यानंतर कळाली. अनेकांनी दिशाचे तोंडभरून कौतुक केले तर बॉलिवूड अभिनेत्री एली एवराम हिने 'बहुत खूप डी' अस ट्विट करून दिशाला प्रोत्साहन दिले.

दिशा पटानी नेहमीच आपल्या वेगवेगळ्या फोटो, व्हिडिओमुळे चर्चेत राहते, दिशाने 'मलंग' या चित्रपटात मुख्य भूमिका केली, तिच्यासोबत अभिनेता आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू हे मुख्य भूमिकेत होते. आगामी काळात दिशाचा 'राधे यार मोस्ट वॉन्टेड' नावाचा चित्रपट येणार आहे. यामध्ये सलमान खान सोबत दिशा मुख्य भूमिकेत असणार आहे, हा चित्रपट ईदला रिलीज होणार होता मात्र, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News