'असा' प्रेमाचा अनुभव नक्कीच घ्यावा..

श्वेता म्हात्रे
Friday, 14 February 2020
  • या दिवशी सगळे आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आपल्या व्हॅलेंटाईनसाठी खास प्लॅन करतात.
  • प्रत्येकजण आपलं प्रेम या दिवशी व्यक्त करत असतो.

या दिवशी सगळे आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आपल्या व्हॅलेंटाईनसाठी खास प्लॅन करतात. प्रत्येकजण आपलं प्रेम या दिवशी व्यक्त करत असतो. अगदी पाच वर्षाच्या मुलापासून ते अगदी सत्तरीच्या आजोबांपर्यंत सगळेजण हा दिवस आनंदाने साजरा करत असतात. कुणी प्रत्यक्षात भेटून आपल्या प्रेमचा संदेश पाठवतो. तर कुणी मॅसेजद्वारे आपल्या भावना सांगतात.

ज्यांनी आयुष्यात प्रेम केल आहे, कोणाला तरी आपल्या मनात घर करून बसवले आहे, अशा व्यक्तीला विसरणं फार अवघड असतं. पहिला पाऊस पडण्याआधी गार वारा सुटला की ते, त्या वाऱ्याचा आनंद घेतात आणि त्या जुन्या दिवसांत रमतात, आजूबाजूला कुणी नसलं तर ओठांवर एखादी कविता किंवा एखाद्या गाण्याची ओळ अगदी सहज गातात. मग हळूच त्यांच्या आठवणींचा कप्पा उघडला जातो. त्यांची पहिल्या भेटीपासून ते अगदी शेवटच्या भांडणापर्यंत सर्वकाही आठवतं. प्रिय व्यक्तीसाठी आपल्या हृदयाच्या लपवलेल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी आपल्याला आकर्षित करणारे प्रथम पावसाचे गंध आपल्याला त्या पेनाने कागदावर कवितामध्ये आपली भावना व्यक्त करण्यासाठी तयार करते.

आज कुठल्याही मॉलमध्ये, कॅफेमध्ये, मल्टिप्लेक्समध्ये, एक मुलगा आणि एक मुलगी, मस्त हातात-हात घालून मस्तपैकी हिंडताना दिसतात. पूर्वी मॉल, कॅफे असलं काही नव्हतं, मग ते दोघं भेटणार तरी कुठे, तर शाळेत, देवळात, कॉलेज मध्ये प्रेमाचा सिलसिला कॉलेजमध्ये सुरु व्हायचा. ते चोरून पाहणं, ते लाजणं, त्यात खूप प्रेमळ भावना आणि आतुरता होती. काही मुलांना तर प्रेम व्यक्त करण्यासाठी मार्गच सापडायचा नाही, मग कुणी तरी गुपचूप त्या मुलीच्या बेंचवर लिहिणार, तिच्या शाळेतून घरी जायच्या रस्त्यावर लपून उभा राहून तिला चोरून बघणार. असं करत करत काही दिवसांनी थेट प्रप्रोज करणं, आणि एकदा का होकार मिळाला की "चांद तारे तोड लाऊंगा तेरे लिये"... ! मात्र आजचं ऑनलाइन प्रेम कधी ऑफलाइन होतं, त्यांनाही कळत नाही. आजच स्मार्ट प्रेम आणि कुठे ते एका नजरेसाठी आसुसलेलं प्रेम. आज प्रेमाची परिभाषाच एवढी कशी बदलली, असा प्रश्नच पडतो. व्हॉटसअप स्टेटस बदलावं तसं आज काल गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बदलतात. आज-कालच्या जगात म्हणतात "चले तो चांद ताक नाही तोच शाम ताक".

प्रेम हे एक वयाचा असा खेळ असतो, जो प्रत्येकालाच अनुभवता येत नाही. कुणीतरी आपलं हक्काचं सतत आपल्या सोबत असावं, सुख-दु:खात पाठीशी राहील अशा व्यक्तीच्या शोधात प्रत्येक जण असतोच, फरक एवढाच असतो की, काही तात्पुरती सोबत शोधतात तर काही सात जन्माचं नातं जोडण्यासाठी सोबत शोधतात. प्रेम हे प्रत्येकाच्याच नशिबात असतं अस नाही. कधी कधी प्रेमाच्या गावात तर येतात लोकं, मात्र त्यांच्या हाती येथून परत जाताना सोबत केवळ अश्रू, एकटेपणा आणि अनुभव असतात. त्यामुळे हृदयात खोलवर कुठेतरी एक जखम लागतं. आठवणींमुळे त्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं होत, मात्र तरीही ती जखम जपून ठेवावी लागते.. चांगला किंवा वाईट असा दोन्ही अनुभव आला असला तरी प्रत्येकाच्या मनात एक तरी व्हॅलेंटाईन असा असतोच जो त्याच्या कायम आठवणीत असतो.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News