'गंगूबाई काठियावाड़ी' चा पोस्टर रिलीज, अलियाची ही भूमिका तुम्ही कधी पाहिली नसेल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 January 2020
  • बऱ्याच प्रतीक्षेनंतर आणि चर्चेनंतर आलिया भट्ट यांच्या चित्रपटाचे पहिले गंगूबाई काठियावाडी पोस्टर आज प्रसिद्ध झाले आहे.
  • संजय लीला भन्साळी दिग्दर्शित असणाऱ्या या चित्रपटाची लोकांची प्रतीक्षा आहे​

नवीदिल्ली : बऱ्याच प्रतीक्षेनंतर आणि चर्चेनंतर आलिया भट्ट यांच्या चित्रपटाचे पहिले गंगूबाई काठियावाडी पोस्टर आज प्रसिद्ध झाले आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित असणाऱ्या या चित्रपटाची लोकांची प्रतीक्षा आहे आणि का नसेल… आलिया या चित्रपटात जी भूमिका करणार आहे तशी भूमिका त्यांनी आता पर्यंतच्या करियर मध्ये केली नाही. भन्साळी प्रॉडक्शन आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट ट्विटर आणि इंस्टाग्रामवर चित्रपटाची दोन पोस्टर्स जाहीर केली आहेत. 

पहिल्या पोस्टरमध्ये आलिया सरळ साधी मुलीसारखी दिसत आहे. जी टेबलाच्या बाजूला बसून काहीतरी विचार करत बसली आहे. पण या निरागस मुलीच्या टेबलावर एक बंदूक आहे. त्याचवेळी, दुसर्‍या पोस्टरमध्ये आलिया एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसली आहे. दूसरा पोस्टर ब्लैक एंड व्हाइट आहे, या पोस्टर मध्ये केवळ आलियाचा चेहरा दिसतो आहे, ज्यावर लाल रंगाची मोठी टिकली लावलेली आहे. या पोस्टर मध्ये आलियाच्या डोळ्यात राग दिसून येत आहे.  

'गंगूबाई काठियावाड़ी' चे दोन्ही पोस्टर खूप शानदार आहेत आणि विशेष करून आलियाचा लूक चांगला आहे. पहिले पोस्टर पाहून तुम्हाला कदाचित 'हायवे' असलेल्या आलियाची आठवण येईल, पण दुसर्‍या पोस्टरमध्ये आलियाचा लूक खूपच चांगला दिसत आहे. हा चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' च्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. चित्रपट 11 सप्टेंबर 2020 रोजी प्रदर्शित होईल.    
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News