हेच तू विसरलास...

अनुजा पाटील
Thursday, 29 October 2020

मला स्पर्श करताच स्वतःचं अस्तित्व गमावून बसलास..
कदाचित, नदी मी वाहणारी शोधात प्रेम सागराच्या..
हेच तू विसरलास...

शब्द फिरवून फिरवून ..
मृगजळचा भास निर्माण करण्यात
तू यशस्वी झालास खरा..
पण वाळवंटात तहानलेला मुसाफिर 
नेहमी वास्तवाच्या शोधात असतो...
हे तू विसरलास..

वादळाचं चक्रव्यूह तूच निर्माण केलं ना...
पण सह्याद्री सारख्या तटस्थ मनाला
साधं हलवताही आलं नाही तुला...
कदाचित सह्याद्रीचा इतिहास वाचणं
तू विसरलास...

द्वेषाच्या अग्नीत ज्वलंत पेटून उठलास ना तू..
किती तो अट्टाहास तुझा,मला जाळण्याचा...
पण द्वेषाच्या अग्नीत मला जाळणारा तू...
मला स्पर्श करताच स्वतःचं अस्तित्व गमावून बसलास..
कदाचित, नदी मी वाहणारी शोधात प्रेम सागराच्या..
हेच तू विसरलास...

-  अनुजा पाटील

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News