व्हॉट्सअॅपचे डिलीट केलेले मॅसेज तुम्ही वाचू शकता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 September 2020

व्हॉट्सअॅपचे डिलीट केलेले मॅसेज तुम्ही वाचू शकता 

महाराष्ट्र - डिजीटल युगात जगत असताना प्रत्येक दिवशी आपल्याला कायतरी नवीन माहित पडतं असतं, किंवा माहित पडलं नाहीतरी आपण ते शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. फेसबुक, इंन्टाग्राम, ट्विटर आणि व्हाट्सअप्पमध्ये नेहमी कायतरी बदल झालेले आपल्या माहिती होतात. कारण सोशल मीडियातील काही असे अॅप्प आहेत की, ते जाणून घेतल्याशिवाय आपलं मन राहतं नाही अशी तरूणांची अवस्था आहे.

सध्याची तरूणाई ही अत्यंत फॅशनिबल जगात आहे, त्याचबरोबर ते नेहमी आपले मोबाईल कपड्याप्रमाणे बदलताना पाहावयास मिळतात. अनेकदा एखादा मोबाईल लॉंन्च झाल्यानंतर तो केव्हा आपल्या हातात पडेल. त्यामध्ये नवीन काय गोष्टी असतील हे जाणून घेण्यासाठी तरूणाई आसुसलेली असते. किंवा एखाद्या अॅप्पमध्ये झालेले बदल सुध्दा तरूणाईला खटकत असतात. कारण तरूणाईने त्याची सवय लावून घेतलेली असते.

आता आपण व्हॉट्सअॅपकडे येऊ, कुठलीही व्यक्ती तीचा मोबाईल पाहिल्याशिवाय अंथरूनातून बाहेर येत असेल असं वाटतं नाही. कारण सकाळी उठल्यानंतर आपली दिवसभरातील नियोजन आपल्या मोबाईलवरती विसंबून असतं. सकाळी उठल्यानंतर कंपनी, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या व्हॉट्सअप्प ग्रुपमध्ये असाल तर तुम्हाला चांगल्या वाईट गोष्टी समजत असतात. विशेष म्हणजे कंपनीची अधिक काम आता व्हाट्सद्वारे होतात असं म्हणायला हरकत नाही.

व्हॉट्सअॅपने आत्तापर्यंत अनेक बदल केले, सुरूवातीच्या आणि आताच्या व्हॉट्सअपमध्ये असंख्य बदल झाले आहेत. हे जगातलं लोकप्रिय असं अॅप आहे. आता तुम्हाला व्हॉट्सअॅप मेसेज मधून डिलीट केलेला मॅसेज वाचता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक अॅप डाऊनलोड करायला पाहिजे.

समोरच्या व्यक्तींनी पाठवलेले मॅसेज डिलीट झाल्यानंतर मनात अनेकांच्या शंका येतात. ते काय लिहिलं असेल यासाठी अनेकजण दिवसरात्र विचार करीत असतात. आता ते वाचता येण शक्य आहे. यासाठी तुम्हाला व्हॉट्स रिमूव्हडं नावाचं अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. त्यासाठी वापरकर्त्यांचा मोबाईल अॅडरॉईड असावा लागेल.  गुगल प्ले वरून हे अॅप डाऊनलोड करावं त्यानंतर अॅपने मागितलेल्या परमिशन द्यावे. परमिशन दिल्यानंतर त्याला सेव्ह करायचे आहे. हे केल्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रक्रियेत व्हॉट्सअॅपला निवडायचे आहे. निवडल्यानंतर परमिशन द्यावी लागेल. त्यानंतर येणा-या सुचना काळजीपूर्वक वाचा इतकं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील डिलीट झालेले मॅसेज वाचता येणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News