तुम्हीही चवीनं आमरस खातायं? सावधान..! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 May 2019

उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबा आणि आमरस यावर प्रत्येकजण ताव मारताना दिसतो. मात्र हा आंबा खाणं जीवघेणं ठरू शकतं. रेडिमेड मिळणार आमरस खाणं तुम्हाला महागात पडू शकत. 

आता उन्हाळ्याची सुट्टी असल्याने आंब्याची मागणी जास्त असते. त्यासोबतच बाहेर आमरस विकणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते. मात्र हाच बाहेर मिळणारा आमरस तुम्ही खात असाल तर तुमच्या जीवाला धोका आहे. 

बाहेर विकण्यात येणार आमरस हा निकृष्ट दर्जाच्या आंब्यापासून तर तयार होतोच, त्यासोबतच त्याला सॅक्रिनची जोड दिली जाते.  या आमरसात सॅक्रिन वापरून त्याची गोडी वाढविण्याचा धंदा सध्या मुमबीत सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 

गेल्या काही दिवसांत हा बनावट आमरस करण्याचे तब्ब्ल ८० लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मर्यादेपेक्षा जास्त सॅक्रिनचा वापर हा शरीरास हानिकारक आहे. 

बाहेर रस्त्यावर विकला जाणारा आमरस हा बनावट असल्याचं उघड झालं आहे. या आमरसामध्ये सुरेख रंग येण्यासाठी आणि गोडी वाढण्यासाठी सॅक्रिनचा वापर करण्यात येत आहे. 

मात्र हा फळांचा गोडवा जीवावर बेतणार आहे. फळांच्या रसात सॅक्रिन वापरण्यास सक्त मनाई आहे. सॅक्रिनचा मर्यादेपेक्षा जास्त वापर केल्यास कॅन्सर होण्याचा धोका होऊ शकतो. याशिवाय मधुमेह देखील होतो. रक्तदाब कमी-जास्त होऊन आजार बळकावू शकतो. त्यामुळे बाहेरील आमरस खाणं टाळा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News