योगी आदित्यनाथ माझ्यावर प्रेम करतात; मला त्यांच्यासोबत राहायचं आहे; पत्र दाखवत तरुणीचा दावा..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • कानपुर येथील एका तरुणीने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रेम असल्याचे म्हटले आहे.
  • मुख्य म्हणजे योगी आदित्यनाथ देखील माझ्यावर प्रेम करतात, असा दावा एका पत्राद्वारे या तरुणीने केला आहे. 
     

कानपुर - कानपुर येथील एका तरुणीने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रेम असल्याचे म्हटले आहे. मुख्य म्हणजे योगी आदित्यनाथ देखील माझ्यावर प्रेम करतात, असा दावा एका पत्राद्वारे या तरुणीने केला आहे. 

हेमा श्रीवास्तव असं या तरुणीचं नाव असून एका १०० रुपयांच्या स्टँम्प पेपरवर तिने लिहिलं आहे की,  ” श्री योगी आदित्यनाथजी, तुम्ही गोरखनाथ मंदिराचे महंत आहेत. सोबतच तुम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असल्याने तुमच्या विरोधात अपशब्द लिहिणाऱ्यास कठोर शिक्षा मिळायला हवी. तुमच्या व्यक्तिगत जीवनावर खोट बोलल्यास काय कार्यवाही होणार हे मला माहिती आहे. मुख्यमंत्रीजी, तुम्ही माझ्या सोबत सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत ऑनलाईन असता परंतु आता तुम्हाला खऱ्या आयुष्यात देखील माझ्या सोबत रहावे लागेल.”

यापुढेही जाऊन या तरुणीने म्हटले आहे की, योगी आदित्यनाथ हे संन्यासी आहेत, मात्र तरीही माझ्यावर प्रेम करता. वास्तविक जीवनात अग्नीच्या सात फेर्यांना आपण महत्व नाही दिले. आपल्या ज्या भावना आहेत, त्या १ वर्षांपासून आहेत.  माझाही जीव तुमच्यात गुंतला आहे. तुम्ही माझ्यासोबतच राहा. 

माझे नशीब खूप फाटके आहे. अतिशय खडतर असा माझा जीवनप्रवास आहे. माझा घटस्फोट झाल्याने आता फक्त माझ्या आईसोबत माझे नाते आहे. आता ऑनलाईन न राहता मला तुमच्यासोबत खऱ्या आयुष्यात सोबत राहायचे आहे. 

मी ३ वर्षापासून घरापासून बाहेर राहते. मी कधी होस्टेल मध्ये राहते तर कधी भाड्याची खोली घेऊन इकडे तिकडे राहत आहे. मुख्यमंत्रीजी फक्त ऑनलाईन तुमच्या सोबत जीवन घालविणे मला शक्य नाही आहे. मी वास्तविक जीवनात आपल्या सोबत राहू इच्छिते. यासाठी माझी आई देखील मदत करायला तयार आहे. 

पुढे या पत्रात तरुणीने लिहिले आहे की, मला  तुमचा आत्मिक परिचय आहे. आपण एकमेकांना एक वर्षांपासून ओळखतो. हिवाळ्यात तुम्ही मला ऑनलाईन संपूर्ण कानपूर दाखविले. याशिवाय आपण अन्ना देशवर मंदिरात ऑनलाईन वडाच्या झाडाच्या ७ परिक्रमा केल्या आहेत, असं देखील म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वीच हेपात्र उपमुख्यमंत्र्यांना दिले होते, त्यांनी तुमच्यापर्यंत हे पात्र पोहोचणार असल्याचं आश्वासन दिल होत, अशी या तरुणीने पत्राद्वारे म्हटलं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News