योगेश-गीतांजली पुन्हा एकदा नव्या भूमिकेत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 6 January 2020

आता हे दोन्ही दमदार कलाकार एका मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. अच्युत नारायण लिखित दिग्दर्शित ‘वेगळी वाट’ या चित्रपटात हे दोघे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

अभिनेते योगेश सोमण यांनी उत्तमोत्तम भूमिका साकारत कला क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवला; तर अभिनेत्री गीतांजली कुलकर्णीने त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेचे सोने केले.

आता हे दोन्ही दमदार कलाकार एका मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. अच्युत नारायण लिखित दिग्दर्शित ‘वेगळी वाट’ या चित्रपटात हे दोघे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. योगेश एका शिक्षकाची; तर गीतांजली त्याच्या पत्नीची भूमिका या चित्रपटात साकारणार आहे.

या  चित्रपटामधील या दोघांचा लूकही प्रदर्शित करण्यात आला असून ते साधे-सरळ दिसत आहेत. या चित्रपटाची कथा वडील-मुली या सुंदर नात्यावर आधारित आहे. हा कौटुंबिक चित्रपट ७ फेब्रुवारीला चित्रपटगृहांत दाखल होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News