यूपी योद्धा संघाचा बंगळूर बुल्सला धक्का

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019

प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात गतविजेत्या बंगळूर बुल्स संघाला सोमवारी तळात असणाऱ्या यूपी योद्धाजकडून पराभवाचा सामना करावा लागला.

अहमदाबाद : प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात गतविजेत्या बंगळूर बुल्स संघाला सोमवारी तळात असणाऱ्या यूपी योद्धाजकडून पराभवाचा सामना करावा लागला.

स्टार पवन कुमार खेळूनही बंगळूरला युपी योद्धाज संगाकडून ३३-३५ अशा पराभवाला सामोरे जावे लागले. युपीचा हा दुसराच विजय ठरला. तत्पूर्वी, आज झालेल्या पहिल्या लढतीत तेलुगू टायटन्स संघाने बंगाल वॉरियर्सला २९-२९ असे बरोबरीत रोखले. 

बंगळूर संघाला पवनच्या १५ गुणांनी देखील विजयाला गवसणी घालता आली नाही. बचावात आलेले अपयशच त्यांच्या पराभवाचे खरे कारण ठरले.

तेलुगूची दुसरी बरोबरी
त्यापूर्वी झालेल्या सामन्यात तेलुगू टाययन्स संघाने रविवारी विजयाचे खाते उघडले आणि त्यानंतर आज बंगाल वॉरियर्सचे आव्हान २९-२९ असे बरोबरीत सोडवले. सूरज आणि सिद्धार्थ देसाई यांनी केलेल्या चढाया तेलुगूसाठी निर्णायक ठरल्या. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News