'यिन'ने राजकारण, समाजकारण, अर्थकारण क्षेत्रांमध्ये अनेक तरूण घडविले - अभिजीत पवार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 August 2020

सध्या आपल्याला चिंतन करायला आणि विचार करायला काही महिने मिळाले आहेत. त्या संधीचा फायदा घ्या," असा सल्ला अभिजीत पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरूणाईला दिला.

'यिन'ने राजकारण, समाजकारण, अर्थकारण क्षेत्रांमध्ये तरूण घडविले -  अभिजीत पवार

"समाजाच्या कल्याणासाठी तरूणाईला घडवण्याचं काम 'यिन' हे व्यासपीठ मागील ६ वर्षांपासून करतंय. 'यिन'च्या माध्यमातून राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा अन्य क्षेत्रांमध्ये राज्यभरात तरूण घडले. ही तरूणांची चळवळ आज महाराष्ट्रातल्या ४ हजार ५०० कॉलेजपर्यंत पोहोचली आहे. ६ वर्षाच्या चळवळीने अनेकांना घडविले, आज तेचं तरूण समाजात उत्तम पध्दतीने काम करीत आहेत," असं प्रतिपादन सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांनी केले. ते आज यिनच्या सहाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरूणाईशी संवाद साधत होते.

"'यिन'ला आज ६ वर्ष पुर्ण झाली, सहा बॅच 'यिन'च्या माध्यमातून घडल्या, घडलेले तरूण, नोकरी, व्यवसाय आणि राजकारणात उतरले. सध्याचं महामारीचं वातावरण भयानक आहे, म्हणून घाबरून जाऊ नका. नोकरी जाईल, व्यवसाय बंद होईल, मग माझं कसं होईल. या विचारातून बाहेर या, खरंतर तरूणांनो ही तुम्हाला सुवर्णसंधी आहे. सध्या आपल्याला चिंतन करायला आणि विचार करायला काही महिने मिळाले आहेत. त्या संधीचा फायदा घ्या," असा सल्ला अभिजीत पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरूणाईला दिला.

"कोरोनामुळे जे काही सुरू होतं ते अनैसर्गिक होतं, कुठे तरी चुकीचं होतं. ते देश पातळीवरती असेल किंवा स्थानिक पातळीवरती असेल, अगदी आपण शिक्षणाचा जरी विचार केला, तरी ही सगळी सिस्टीम कशाला आपण राबवितोय, म्हणजे मी एक विचार करत होतो की आपण काय शिकतो आणि त्याचा फायदा काय मुलं शिकतात. तशी पालकांची सुध्दा इच्छा असते. माझ्या मुलाने चांगल्या कॉलेजमध्ये गेलं पाहिजे. यासाठी की उद्या चांगली नोकरी मिळाली पाहिजे किंवा त्याने उद्या एखादा उद्योग सुरू केला पाहिजे. फक्त चार पैसे कमावणे हाच उद्देश झालाय असं वाटायला लागलंय. इतकी वर्षे शिकून डिग्री मिळवायचा पण त्याचा समाजाच्या कल्याणासाठी व्हायला. " हे एक उत्तम उदाहण देऊन अभिजीत पवार यांनी मिळालेल्या वेळेत पुर्वी भारतात काय चालत होते, याचा अभ्यास करावा असं तरूणाला सांगितलं.

"आता मिळालेला गॅप हा तरूणाईला शिकण्यासाठी आहे, त्या गॅपचा तरूणाईने फायदा करून घेतला पाहिजे. तुम्ही चांगले शिक्षण घ्या, नोकरी करा, व्यवसाय करा. पण कुठेतरी स्वत: च्या स्वार्थापोटी जगायचं हे काही योग्य नाही. आपण खरंच समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. समाजाच्या कल्याणसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून काहीतरी शिका. एखादी पदवी आपल्याला मिळते, त्यामुळे किती समाजाचा फायदा होऊ शकतो. आज मी डॉक्टर झालो किंवा अभियंता झालो, तर ख-या अर्थाने लोकांची सेवा करणार का ? या उद्देशाने तुम्ही पदवी घेतली पाहिजे" असं मार्गदर्शन अभिजीत पवार यांनी केले.

"अनेक कंपन्याचे सीईओ जर भारतीय असतील, तर मग जग कंट्रोल करतंय, तर भारतीयांनो या भ्रमात राहू नका, हे सीईओ भारतीय आहेत, पण ते इंग्रजांची नोकरी करीत आहेत. ते सेवा करीत आहेत चांगली गोष्ट आहेत. परंतु इतर देशाने घातलेल्या पायंड्याला पुढे नेण्याचं काम तुम्ही करीत आहात. सगळं शिक्षण झालं भारतात आणि नोकरी करताय परकीय देशाची याला काही अर्थ नाही. तुम्ही जिथे शिकलाय वाढलाय त्यासाठी काहीतरी करा असा सल्ला अभिजीत पवारांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तरूणाईला दिला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News