यिनचा मुख्यमंत्री झालो आणि मग...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 August 2020
  • ‘यिन’ चा आज ६ वा वर्धापिदन...
  • सकाळ माध्याम समूहाने तरूणांसाठी 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' अर्थात यिन सुरू केले.
  • आज ‘यिन’ चा ६ वा वर्धापिदन आहे. राज्यातील तरुणांच्या कलागुणांना वाव देणे हा यामागचा उद्देश होता.

सकाळ माध्याम समूहाने तरूणांसाठी 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' अर्थात यिन सुरू केले. आज ‘यिन’ चा ६ वा वर्धापिदन आहे. राज्यातील तरुणांच्या कलागुणांना वाव देणे हा यामागचा उद्देश होता. त्यासाठी यिनने तरूणांसाठी अनेक नवनविन उपक्रम सुरू केले आहेत. या विविध उपक्रमात महाराष्ट्रातून अनेक तरुण सहभागी झाले. आजही हे व्यासपीठ तरूणांसाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. या सर्व गोष्टीची आखणी करण्यासाठी यिनने एक मंत्रीमंडळ स्थापन केले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात असतात त्याप्रमाणे सर्व मंत्री या मंत्रिमंळात देखील होते. आज सहा वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मुख्यमंत्री झाले त्यातील काही मुख्यमंत्र्याचा प्रवास आणि त्याचे कार्य याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात.

कॉलेज च्या मुलांचे प्रश्न मला हाताळायचे होते आणि तशी सुरुवात झाली. पुढे जाऊन मुंबई जिल्हा प्रमुख पदी माझी निवड झाली आणि यिन च्या सदस्यांना बरोबर आम्ही मुंबईतील विविध सामाजिक प्रश्नांवर आम्ही काम करायला सुरुवात केली काही दिवस नंतर सगळ्या जिल्हा प्रतिनिधींना मुंबईत एकत्र बोलावून तीन दिवशीय शिबीर घेण्यात आले ,त्यात वेगवेगळ्या वेगवेळ्या मान्यवरांनी आम्हाला मार्गदर्शन  केले ते आमच्या भविष्य साठी खूप महत्वाचे ठरणार आहे ,शिबिराच्या तिसऱ्या दिवशी यिन मंत्री मंडळाची स्थापना करण्यात आली. यिन ने आम्हाला खूप काही दिले आज महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात आमची ओळख झाली आहे. मला तर मी राहतो त्या विभागात आदराचा स्थान मिळाले आहे आणि राजकीय पक्ष्याची मला त्यांच्या पक्षात घेण्यासाठी चढाओढ चालली आहे आणि येणाऱ्या मुंबई महानगर पालिकेचे तिकीट सुद्धा ऑफर केले आहे  अश्या बऱ्याच गोष्टी सध्या घडत आहेत.  यिनच्या पहिल्या मंत्री मंडळाच्या मुख्यमंत्री पदाचा मान मला मिळाला, दुसऱ्या दिवशी सकाळच्या पहिल्या पानावर बातमी छापून आली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून माझं कौतुक होऊ लागले फोन वर फोन येऊ लागले जिथे जाईल तिथे माझीच चर्चा मलाही हे सगळं स्वप्नवतच होत पुढे जाऊन महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळाली. सध्या सामाजिक संस्थांबरोबर मिळून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी  आदिवासी पाडे .झोपडपट्टी मधील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासा व्हावा ह्या साठी काम करतोय व सध्या नुकतेच माझे इ बुक छोलिंगो प्रकाशित झाले आहे.आणि इतर काही कथांचे लेखन चालू आहे.

-संदीप पालवे, यिनचे माजी मुख्यमंत्री

 

यिन कडून एक प्रेरणा,  जिद्द मिळाली. स्वप्नांच्या पलीकडे जाण्याची दिशा आणि त्यातून सुरु केला चळवळीत प्रवेश. निवडणुका येत असतात पण प्रत्येक निवडणूक जिंकायची आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद जिंकायचं मनाशी बाळगलेले आणि तसेच झाले. महाराष्ट्राचे यिनचे मुख्यमंत्रीपद मिळाले आणि त्यानंतर कामाला अजून गती आली. बरेच गावांमधील ओढ्यांवरती बंधारे बांधले. मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, फुटपथ स्कूलची निर्मिती करण्यात आली. आय.एस, आ.पी.एस अधिकाऱ्यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आली. नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली. पोलीस मित्र संकल्पना राबवून पोलिसांबरोबर शहरांमध्ये वाहतूक नियंत्रणाचे काम करण्यात आले आणि आता  शिक्षण संपल्या संपल्यानंतरही तरुण मुलांचा संपर्क रहावा या निमित्ताने प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कृषी महाविद्यालयां मध्ये मोफत प्रशिक्षण देण्यात आली.  यातून रोजगार मिळावा हा उद्देश मनाशी बाळगून ९  ऑगस्टला क्रांती दिनानिमित्त पदवीधर नवक्रांती संघटनेचे निर्मिती करण्यात आली. सर्व यिन मुळे शक्य झाले. याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

-अनिकेत मोरे, यिनचे माजी मुख्यमंत्री  

 

अर्थमंत्री असतांना शिष्यवृत्ती संर्दभाचे विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावले. तसेच या काळात पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभाराची अधीकाऱ्यांना जाणीव करून दिली. नाशिकमधील विविध कॉलेज मध्ये यिन संवाद नावाचा मोठे कार्यक्रम घेतले. ज्यात IAS-IPS अधीकाऱ्यांसोबत विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणला. त्यांनतर मे महिन्यात  "चला घडू या देशासाठी" या तीन दिवसीय उन्हाळी शिबीराची जबाबदारी नाशिक यिन जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावर आली. त्यानंतर आरोग्यविषयक सेवा पण त्या काळात मोठ्या प्रमाणावर मी केली एक तनिष्का भगिनीचा मुलगा ज्याला ब्लड कॅन्सर झाला होता. त्या मुलाला संदीप काळे सरांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून दिला. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा तो क्षण होता. मला खूप मोठी जीवनाची शिदोरी यिन मधून मिळाली. यिनने मला खूप काही दिले आहे. तेजस पाटील मध्ये गुण होते पण त्याला महाराष्ट्रस्तरावर कमी वयात काम करण्याची संधी यिनने मला दिली. यिन मध्ये काम करत असतांना मला जाणीव झाली की, परिवर्तन करण्यासाठी आपले चांगले विचार आणि काम करण्याची जिद्द चिकाटी महत्वाची असते. यिनने अर्थमंत्री केल्यावर मला खूप आनंद झाला. अर्थमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांच्या ओळखी वाढल्या आहेत. सध्या मी भारतीय राष्ट्रीय युवा परिषद या संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष आहे. त्यासोबत स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन जळगांव जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. यावल तालुका शेतकी खरेदी विक्री संघामध्ये संचालक आहे. माझे स्वतःचा "तेजस कन्स्ट्रक्शन" या नावाने कंपनी आहे. सेंद्रिय खते आणि इतर प्रॉडक्ट्स यामध्ये सुद्धा काम करत आहे.

-तेजस पाटील, यिनचे माजी मुख्यमंत्री

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News