काल परवा तिच्या खांद्यावरचा तीळ पाहिला आन...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 April 2019

सुट्टी, ती, एकत्र गप्पा आणि बरचं काही...

रिलेशन म्हणजे काय, हे माहित होण्याआधीच रिलेशनमध्ये पडण्याऱ्यांसाठी या गोष्टी खास वाटतात, ज्या हेडींगला झळकत आहेत. पण तसं खूप गंभीररित्या पाहिला गेल्यास, जबाबदारीचा आणि विश्वासाचा मार्गसुध्दा यावेळी गरजेचा असतो, जो त्यांच्यात होता. 

आयुष्याच्या भोवती फिरणारं एक नातं, ते म्हणजे प्रेम. तिची आणि त्याची भेट होणे, पहिल्याच वेळेस बोलणं होणे, दुसऱ्यावेळेस बरच काही. या बरच काहीमध्ये खूप काही दडलेलं आहे, हे मात्र नक्की. ती त्याच्या आयुष्यात येणे, वेगळ्या गोष्टी घडणे, वेगळ्याप्रकारचे बोलणे सुरू होणे, वेगळ्या भावना, वेगळा वेळ आणि त्या सगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये हरवत जाणारे ते दोघे.

काल परवा त्या दोघांची भेट झाली. एकत्र गप्पा सुरूच होत्या, पण मुंबईच्या मरिन लाईनवर सुरू असणाऱ्या टवाळ खोऱ्यादेखील त्यांच्यात होत होत्या. एकाबाजून आयुष्याच्या गोष्टी सुरू होत्या, तर दुसऱ्या बाजूने त्यांच्यातलं एकमेकांचं वेगळेपण समोर येत होत.

खूप काही गप्पा गोष्टी त्यांच्यात झाल्या होत्या, असं नाहीच मुळी, पण ज्या काही झाल्या त्या खरचं त्या दिवसातल्या आणि इथून मागच्या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकणाऱ्या होत्या. त्यांच्या दोघात अशाच गप्पा सुरू असताना त्याची नजर तिच्या खांद्यावर असणाऱ्या तिळाकडे गेली. तसं पाहिला गेल्यास तो तीळ मानेच्या जवळ असल्याने सहाजिकच दिसणारंच; मात्र त्याच्या नजरेने काही वेगळंच पाहिलं असावं. कारण त्याच मानेवरच्या तिळाने त्याला खूप गोष्टींची आठवण करून दिली होती. असाच तो खास तिळ त्या दोघांच्या भेटीतला केंद्रबिंदू ठरला. हे नक्की. 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News