'ये है चाहते'ही मालिका प्रेक्षकांच्या पसंदीची? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 28 December 2019

'ये हे मोहबतें'पाठोपाठच आता 'ये हे चाहते' नावाची मालिका सुरू होणार आहे. यात सगून कौर लुथ्रा (प्रिशा) आणि अब्रार काझी (रुद्राक्ष) यांची प्रमुख भूमिका आहे.

'ये हे मोहबतें' या गाजलेल्या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील रमन इशिता घराघरात लोकप्रिय झाले होते. 'ये हे मोहबतें' मालिका संपल्यानंतर निर्माते आता प्रेक्षकांसाठी एक नवीन आणि फ्रेश मालिका घेऊन येत आहेत. कोणती आहे ही मालिका?
'ये हे मोहबतें'पाठोपाठच आता 'ये हे चाहते' नावाची मालिका सुरू होणार आहे.

यात सरगून कौर लुथ्रा (प्रिशा) आणि अब्रार काझी (रुद्राक्ष) यांची प्रमुख भूमिका आहे. मालिकेत प्रिशा ही एका मुलाची एकटी आई आहे. सारांश हा तिच्या गोंडस लेकाची भूमिका करतोय. तिची बहिण काही कारणाने मृत्यूमुखी पडते, त्यानंतर तिची बहिण प्रिशा मुलाला सांभाळते. नंतर तिच्या संघर्षाची कहाणी यात दाखवली जाणार आहे.

'ये हे मोहबतें'मध्ये इशिताने रमनची दुसरी पत्नी बनून त्याच्या कुटुंबाला सावरलं होत. या नवीन मालिकेत प्रिशाला तिचा साथीदार आणि त्याची भक्कम साथ मिळेल का हे मालिका पाहूनच समजेल.
ये हे मोहबतें मालिका प्रेक्षकांना खूप पसंत पडली होती. या नवीन मालिकेला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं गंमतीशीर ठरेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News