बड्याबड्या इंग्लिश सिनेमांना टक्कर देत 'या' चित्रपटाला मिळणार यंदाचा ऑस्कर?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 February 2020
  • चित्रपटसृष्टीमध्ये मग त्यामध्ये मराठी,हिंदी, इंग्लिश किंवा इतर भाषेतील चित्रपट असो. या सर्व चित्रपटसृष्टींमध्ये  ऑस्कर पुस्काराला महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक दिग्दर्शकाला तसेच कलाकारांना वाटत असते की आपल्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळावा. परंतु हा पुरस्कार सहजासहजी चित्रपटाला मिळत नाही. त्यासाठी चित्रपटाची कथा, संगीत, संवाद आणि महत्वाचं म्हणजे अभिनय या सर्वांची योग्य सांगड त्या चित्रपटाला असणे गरजेचे असते.

मुंबई : चित्रपटसृष्टीमध्ये मग त्यामध्ये मराठी,हिंदी, इंग्लिश किंवा इतर भाषेतील चित्रपट असो. या सर्व चित्रपटसृष्टींमध्ये  ऑस्कर पुस्काराला महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक दिग्दर्शकाला तसेच कलाकारांना वाटत असते की आपल्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळावा. परंतु हा पुरस्कार सहजासहजी चित्रपटाला मिळत नाही. त्यासाठी चित्रपटाची कथा, संगीत, संवाद आणि महत्वाचं म्हणजे अभिनय या सर्वांची योग्य सांगड त्या चित्रपटाला असणे गरजेचे असते.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सर्वच जण आतुरतेने वाट बघत असतात. ९२ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा काही दिवसांतच सुरु होणार आहे. आणि त्यामुळेच ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन असणाऱ्या चित्रपटांची यादीही जाहीर करण्यात आली असून अनेक मोठया चित्रपटांमध्ये एक चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. हा चित्रपट कोरियन भाषेतील असून हा  चित्रपट इंग्रजीतल्या अनेक चित्रपटांसमोर आव्हान ठरला आहे. चित्रपटाचे नाव 'पॅरासाईट' असे आहे. हा चित्रपट थेट ऑस्करसाठी नॉमिनेट झाला आहे.

हॉलीवूड्चे अनेक मोठमोठे चित्रपट असूनही हा कोरियन चित्रपट ऑस्करमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. आतापर्यंतच्या इतिहासात हॉलीवूड्च्या जास्तीत जास्त चित्रपटांनी ऑस्करवर आपलं नाव कोरलं आहे. असे असतानाच कोरियन भाषेतला  'पॅरासाईट' हा चित्रपट ऑस्करच्या नॉमिनेशनपर्यंत पोहचला असल्याने त्याच्या नावाची सगळीकडे चर्चा होत आहे. कदाचित याच चित्रपटाला यावेळीच ऑस्कर पुरस्कार मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

'पॅरासाईट' हा चित्रपट बाँग जून हू यांनी मांडलेल्या किम या कुटुंबाच्या कथेवर आधारित आहे. हातावरचं पोट असणारं हे कुटुंब कर्जदारांपासून लपण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधत असते. तळघरात लपलेल्या या कुटुंबात आपल्या नवऱ्याला शोधण्यासाठी एक महिला येते आणि त्यातूनच पुढील नाट्य सुरु होते. या चित्रपटाचं जगभरात कौतुक होत असून या चित्रपटाला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तर आता ९  तारखेला होणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जर या चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला तर एक वेगळाच इतिहास रचला जाईल.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News