यंदा कला शाखेच्या प्रवेशासाठी विद्यार्थांची चुरस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 July 2020
  • राज्य मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालामध्ये कला शाखेचा निकाल यंदा तब्बल ६.१८ टक्‍क्‍यांनी वधारला आहे.
  • मुंबईतील दक्षिण मुंबईतील नामांकित महाविद्यालयांचा कला शाखेचा निकाल ९९ ते १०० टक्के लागला आहे; तर अनेक महाविद्यालयांचा कला शाखेचा निकाल विज्ञान शाखेपेक्षा अधिक असल्याने यंदा पदवी प्रथम वर्ष कला शाखेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चुरस लागणार आहे.

मुंबई :- राज्य मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालामध्ये कला शाखेचा निकाल यंदा तब्बल ६.१८ टक्‍क्‍यांनी वधारला आहे. मुंबईतील दक्षिण मुंबईतील नामांकित महाविद्यालयांचा कला शाखेचा निकाल ९९ ते १०० टक्के लागला आहे; तर अनेक महाविद्यालयांचा कला शाखेचा निकाल विज्ञान शाखेपेक्षा अधिक असल्याने यंदा पदवी प्रथम वर्ष कला शाखेच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चुरस लागणार आहे.

एकेकाळी विज्ञान, वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक होता; परंतु गेले काही वर्षांपासून दहावीनंतर अनेक विद्यार्थी कला शाखेत प्रवेश घेऊ लागले आहेत. कला शाखेतून करिअरचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने बारावीनंतर कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांना मागणी वाढली आहे. यंदा बारावीच्या निकालात मुंबई विभागाचा कला शाखेचा निकाल ८०.४१ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात वाढ झाली असून ३८ हजार ९४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातून नामांकित पदवी महाविद्यालयात प्रवेश मिळवणे विद्यार्थ्यांना जिकिरीचे ठरणार आहे.

नामांकित महाविद्यालयातील ठराविक विषय मिळविण्यासाठी कला शाखेचे अनेक विद्यार्थी प्रयत्नशील असतात. करिअरच्या दृष्टीने आवश्‍यक विषय मिळविण्यासाठी विशिष्ट ध्येयाने प्रेरित असलेले हे विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असतात. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस लागेल, असे चेतना कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य गिरीश साळवे यांनी सांगितले.

इतर शाखांपेक्षा कला शाखेचा निकाल अधिक असणारी महाविद्यालये

के. सी. महाविद्यालय - कला- १०० % (वाणिज्य - ९९.६६ %)
के. जे. सोमय्या - कला- १०० % (वाणिज्य - ९९.४७ %)
सेंट झेवियर - कला- ९९.७१ % (विज्ञान - ९८.५२ %)
रूपारेल - कला- ९९.७१ % (विज्ञान - ९५.६८ %)
एसआयईएस - कला - ९९.३ % (विज्ञान – ९६.९७ %)
स्वामी विवेकानंद – कला – ९८.५२ % (विज्ञान – ९८.२८ %)
सोफिया – कला - ९७.१८ % (विज्ञान – ९५.०३ %)
विल्सन – कला – ९७.०८ % (विज्ञान – ९५.०८ %)

कला शाखेचा 90% पेक्षा जास्त निकाल लागलेली महाविद्यालये

मिठीबाई - ९९.५६ %
केळकर – ९८.७९ %
रुईया - ९७.१४ %
सोमय्या विनय मंदिर – ९३.४७ %
एनकेटी, ठाणे - ९३.३८ %
जोशी-बेडेकर, ठाणे - ९२.११ %
खालसा - ९१.४५ %
नॅशनल - ९०.९१ %
एन. एल. (मालाड) – ९०.१४ %
भवन्स – ९०.१२ %
विकास (विक्रोळी) – ९०.०० %
बिर्ला (कल्याण) – ८९.९१ %

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News