सातारा डिजिटल युथ फेस्टिवल मध्ये YCIS द्वितीय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 August 2020

यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या महाविद्यालयाचे प्रवीण कोळपे व प्रज्वल ढमाळ या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले

सातारा: श्रीनिवास फाऊंडेशन प्रस्तुत सातारा युथ फेस्टिवल अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतर- महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या महाविद्यालयाचे प्रवीण कोळपे व प्रज्वल ढमाळ या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल सर्व स्तरांतून महाविद्यालयाचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. प्रस्तुत स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. बी. टी जाधव व  सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनीषा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News