यवतमाळमध्ये होतोय, मोबाईलच्या दुष्परिणामापासून मुलांना वाचविण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 28 July 2019

यवतमाळमध्ये होतोय, मोबाईलच्या दुष्परिणामापासून मुलांना वाचविण्याचा प्रयत्न
यवतमाळ बालरोगतज्ज्ञ संघटनेचा अभिनव उपक्रम ‘उमलती फुले‘

यवतमाळ - आज आपण 21 व्या शतकात पदार्पण करत असताना तांत्रिक पातळीवर आपली खूप प्रगती झाली आहे. स्मार्टफोनचे या युगात आघाडीचे स्थान आहे. सहा महिन्याच्या बाळापासुन ते 70 वर्षाच्या आजोबांजवळ स्मार्टफोन बघायला मिळतो. जितका तो उपयोगी, तितकेच त्याचे दुष्परिणाम आहेत. विशेषकरून बालपणात जेव्हा मुलांची शारीरिक, बौद्धिक, भावनिक वाढ होत असते, त्यावेळेस या स्मार्टफोनमुळे मुलांवर काय दुष्परिणाम होऊ शकतात, ते टाळण्यासाठी काय उपाययोजना अवलंबल्या पाहिजे. याबाबत‘उमलती फुले’ या प्रकल्पाच्या माध्यमातुन अवगत करण्याचा  मानस यवतमाळ बालरोगतज्ज्ञ ससंघटनेने केला आहे.

जेणेकरून सर्व मुलं बौद्धिक, भावनिक पातळीवर अग्रेसर राहतील. आजच्या मुलांवर आपल्या देशाचे उज्वल भविष्य अवलंबून आहे. सोशल मिडीया उदाहरण वाँटसअँप, फेसबुक, इन्स्टाग्राम, गेम्स, शाँपीग अॅप्स सारख्या गोष्टी मुलांना आकर्षित करतात. विशेषकरून किशोरवयात संवादासाठी महत्वाचे माध्यम आहे; पण कदाचित आपणास कल्पना नसेल पाच तासापेक्षा जास्त स्मार्टफोन वापरणार्यामध्ये आत्महत्येचे प्रमाण 71 टक्के आहेत. 

या अनुषंगाने ‘सुसंस्कार विद्या मंदीर, यवतमाळ येथे शनिवारी (ता.27) पालकांसोबत हा कार्यक्रम आयोजित केला होता. पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी यवतमाळ शहरातील तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. डॉ. हर्षलता गायनर, स्त्री रोग व प्रसुतीशास्त्रतज्ञ यांनी मोबाईल अतिवापराची सध्याची परिस्थिती व त्यांचे मुलांवर होणारे घातक दुष्परिणाम यावर मार्गदर्शन केले. 

डॉ. स्वाती पाटील, बालरोगतज्ज्ञ यांनी मोबाईलचा अतिवापर म्हणजे एक व्यसन, मेंदूमध्ये होणारी घडामोड यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर डॉ. संजय रत्नपारखी, बालरोगतज्ज्ञ यांनी त्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे, याबाबत सर्वांना संबोधित केले. कार्यक्रमात मार्गदर्शन पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ.विंरेद्र राठोड, सचिव डॉ.सारंग तारक, डॉ.स्वप्नील मानकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच सुसंस्कार विद्या मंदिर च्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. यवतमाळातील सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम येत्या काही दिवसात ते राबविणार असून पालकांना आणि विध्यार्त्याना या उपक्रमाद्वारे मोबाईलच्या विळख्यापासूम वाचविण्याचा आमचा प्रयत्न आहे असे या कार्यक्रमाच्या प्रकल्प अधिकारी डॉ. हर्षलता गायनर यांची बोलताना सांगितले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News