"या" खेळाडूंना मिळणार यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 August 2020
  • दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांसाठी नामांकन जाहीर करण्यात आली आहेत.
  • या पुरस्काराकरीता भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याच नाव यावर्षीच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नामांकन यादीत आहे.

मुंबई :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांसाठी नामांकन जाहीर करण्यात आली आहेत. या पुरस्काराकरीता भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याच नाव यावर्षीच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नामांकन यादीत आहे. मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकर, कॅप्टन कूल एमएस धोनी, भारताचा कर्णधार विराट कोहली या तीन क्रिकेटपटूंना याआधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता भारताचा सलामीवीर रोहित शर्मा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणार चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. रोहित शर्मा सोबतच कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा तसेच २०१६ रोजी भारताला पॅराऑलम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारी मारियाप्पन थांगावेलू यांना देखील यावर्षीच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराच्या नामांकन यादीत स्थान मिळाले आहे. 

राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या वितरणा संबंधित काल निवड समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या निवड समितीच्या बैठकीत या खेळाडूंच्या नावांवर शिक्का मोर्तब केला गेला. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार या राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंच्या यादीला क्रीडा मंत्रानी हिरवा कंदील दिला की राष्ट्रपती रामनाथ कोविंद  हे यापुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान करतील. 

रोहित शर्मा हा भारताचा उत्कृष्ट सलामीवीर असून त्याच्या नावे अनेक विक्रमही नोंदवले गेले आहेत. २०१९ हे वर्ष रोहित शर्माच्या क्रिकेट करियर मधील एक महत्वपूर्ण वर्ष ठरले. २०१९ मधील एकदिवसीय क्रिकेट सामन्यात रोहित शर्माने तब्बल सात शतके ठोकून १४९० धाव केल्या. २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक मालिकेत रोहितने विक्रमी ५ शतक लगावली आणि ६४८ धावा केल्या. २०१९ मध्ये पारपडलेल्या एकदिवसीय विश्वचषक सामन्याच्या उपांत्य फेरीत तो भारताचा एक मजबूत आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून समोर आला. २०२० वर्षाच्या सुरुवातीला रोहित शर्माला आयसीसीकडून "वनडे क्रिकेटर ऑफ द इयर" म्हणून गौरविण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News