टिकटॉक विकत घेण्यासाठी 'या' दोन दिग्गज कंपन्या तयार; जाणून घ्या कोण मारणार बाजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 August 2020

जगातील सर्वांत मोठी कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि आयटी कंपनी ओरॅकल टिकटॉक विकत घेण्यासाठी पुढे आल्या आहेत.

तरुणाईचं सर्वाधिक लोकप्रिय टिकटॉक विकत घेण्यासाठी अमेरिकेच्या दोन दिग्गज कंपन्यामघ्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. जगातील सर्वांत मोठी कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि आयटी कंपनी ओरॅकल टिकटॉक विकत घेण्यासाठी पुढे आल्या आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ओरॅकल कंपनीने टिकटॉकची मुळ कंपनी बाईटडान्स सोबत चर्चा केली. ही चर्चा सध्या प्राथमिक तत्त्वावर सुरु आहे. मात्र यापूर्वीच बाईटडान्स कंपनी मायक्रोसॉफ्टने विकत घेण्याचे तयारी दर्शविली होती. आता या दोन कंपनीमध्ये सुरस निर्माण झाली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवसापूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, बाईटडान्स कंपनीने 90 दिवसांमध्ये अमेरिकेचा व्यापार विकून टाकावा. यानंतर मायक्रोसॉफ्टने ही कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शवली. मात्र ओरॅकल कंपनीचे संस्थापक उद्योगपती एलिसन डोनल्ड ट्रम्प बाईटडान्स कंपनी विकत घेण्यासाठी अनुकुल आहे. त्यांनी अधिकृतपणे कोणताही घेषणा केली नाही.

देशात टिकटॉकने सर्व सामान्य जनतेला स्टार बनवले. त्यामुळे तरुणाईमध्ये टिकटॉकची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने टिकटॉक आणि काही चायना अॅपवर बंदी घातली, त्यामुळे टिकटॉक बंद झाले. मुकेश अंबानीची रिलायन्स कंपनी टिकटॉक विकत घेण्यासाठी पुढाकार घेऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली मात्र रिलायन्सने अधिकृतपणे या विषयी माहिती देण्यास टाळली आहे. टिकटॉक अँप भारतात सुरू करण्याविषयी सध्यातरी कोणतीही हालचाल सुरू नाही. टिकटॉकची मूळकंपनी बाईटडान्स देशात टिकटॉक सुरु करण्यात उत्सूक दिसत नाही, त्यामुळे भारतात टिकटॉक केव्हा सुरू होईल हे सांगणे कठीन आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News