'या' मोबाईल कंपन्या भारतात उत्पादन सुरु करणार; १२ लाख रोजगार निर्मिती होणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 August 2020

दिवसेंदिवस मोबाईलची मागणी वाढत आहे, त्यामुळे जगभरातील नामांकीत बावीस कंपन्या भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यात सॅमसंग, लावा, डिक्सॉन, राइजिंग स्टार आणि आयफोनला साहित्या पुरवणाऱ्या विस्ट्रोन, पेगाट्रॉन फॉक्सकॉन या तीन कंपन्यांचा समावेश आहे.

नवी दिली : 'विदेशातील आघाडीच्या २२ मोबाईल कंपन्यांनी भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल केला. त्यामुळे देशातील १२ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे' अशी माहिती केंद्रीय दुरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी (ता. ०१) प्रसार माध्यमांना दिली.

दिवसेंदिवस मोबाईलची मागणी वाढत आहे, त्यामुळे जगभरातील नामांकीत बावीस कंपन्या भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यात सॅमसंग, लावा, डिक्सॉन, राइजिंग स्टार आणि आयफोनला साहित्या पुरवणाऱ्या विस्ट्रोन, पेगाट्रॉन फॉक्सकॉन या तीन कंपन्यांचा समावेश आहे. प्रोडक्शन लिंक्ड इनसेन्टिव्ह योजनेअंतर्गत या कंपन्या पाच वर्षात १५ हजार पेक्षा अधिक उत्पादने निर्माण करणार आहेत. त्यांची किंमत सरासरी ११ लाख ५ हजार कोटी रुपये असले. मोबाईल फोनच्या एकुण विक्री पैकी ६० टक्के महसूल अॅपल आणि सॅमसंगला जातो. देशात मॅन्युफॅक्चरिंग निर्माण झाल्यास सर्व कंपन्यांचा विक्री महसूल वाढण्यास मदत होणार आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.. 

बारा लाख तरुणांना मिळणार रोजगार 

या कंपन्या भारतामध्ये उत्पादन सुरू केल्यानंतर बारा लाख तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. त्यापैकी तीन लाख रोजगार थेट उपलब्ध होतील आणि नऊ लाख रोजगार अप्रत्यक्ष निर्माण होतील. बाजारात भारतीय मोबाईलची व्हॅल्यू सध्या १५ ते २० टक्के आहे, उत्पादन सुरु झाल्यास ३४ ते ४० टक्क्यांनी व्हॅल्यू वाढणार आहे.    

प्रोडक्शन लिंक्ड इनसेन्टिव्ह योजना

देशात तयार केलेल्या उत्पादनावर ४ ते ६ इन्सेंटिव्ह योजनेद्वारे कंपन्यांना देण्यात येणार आहे. ज्या कंपनीचे उत्पादन चांगले असले त्यांना पुढील ५ वर्षाकरिता इन्सेंटिव्ह लागू राहणार आहे. त्यामुळे कंपन्यांना अधिक नफा मिळणार आहे. त्यासाठी मुळ आर्थिक वर्ष २०१९ ते २०२० ग्राह्य धरण्यात येईल. या योजने अंतर्गत अर्ज करण्याती अंतिम कारीख ३१ जुलै होती. अर्ज केलेल्या कंपन्यांना १ आगस्ट पासून योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News