दहावीचा निकाल जाहीर; ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 July 2020

या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहा
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.mahresult.nic.in 

दहावीचा निकाल जाहीर; ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

महाराष्ट्र - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदाच्या परीक्षेत ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. विशेष म्हणजे ८,३६० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. १७ लाख ९ हजार २६४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी  १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी परीक्षेत पास झाले. 
 
गेल्यावर्षी सर्वात कमी विद्यार्थी पास झाले होते, २००६ सालानंतरचा सर्वात कमी निकाल असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते.तसेच त्यामागे नवा अभ्यासक्रम असल्याचं शिक्षण विभागाचं म्हणणं होतं. पण यंदाच्यावर्षी मात्र दहावीच्या निकालाने प्रचंड मोठी उसळी घेतली आहे. १८.२० टक्क्यांनी निकालात वाढ झाल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. 

यंदाच्यावर्षी कोकण विभागाने ९८.७७ टक्के मिळवून बाजी मारली आहे, त्यानंतर ९७.६४ टक्के मिळवत कोल्हापर दुस-या क्रमांकावर आणि ९७.३४ टक्के मिळवत पुणे तिस-या क्रमांकावर आहे. राज्यातील २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

विभागनुसार टक्केवारी
कोकण - ९८.७७ टक्के
पुणे- ९७.३४ टक्के
कोल्हापूर - ९७.६४ टक्के
अमरावती - ९५.१४ टक्के
नागपूर - ९३.८४ टक्के
मुंबई- ९६.७२ टक्के
लातूर - ९३.०७टक्के
नाशिक - ९३.७३ टक्के
औरंगाबाद - ९२ टक्के

या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहा
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.mahresult.nic.in 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News