नताशा-हार्दिकच्या एन्गेजमेंट फोटोवर केली एक्स बॉयफ्रेंड अलीनी कमेंट !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020

नताशाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर असलेल्या अली गोनीनं या दोघांच्या एन्गेजमेंटच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. 

'नच बलिये' या रिअॅलिटी शोच्या सेटवर नताशा आणि अलीची भेट झाली होती. नच बलियेच्या नवव्या सीझनमध्ये नताशा-अली या जोडीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

गेल्या दोन दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकशी दुबईत एन्गेजमेंट केल्यानंतर या चर्चेला आणखी उधाण आले आहे. 

साखरपुडा उरकल्यानंतर गुरुवारी (ता.2) हे कपल दुबईहून मुंबईला परतले. या एन्गेजमेंटचे फोटो दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. यानंतर नताशाच्या एक्स-बॉयफ्रेंडने यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. नताशाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर असलेल्या अली गोनीनं या दोघांच्या एन्गेजमेंटच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. 

'नच बलिये' या रिअॅलिटी शोच्या सेटवर नताशा आणि अलीची भेट झाली होती. नच बलियेच्या नवव्या सीझनमध्ये नताशा-अली या जोडीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. अली आणि नताशा अनेक महिने रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, नच बलियेच्या दरम्यान त्यांचे ब्रेकअप झाले. त्यामुळे त्यांना नच बलियेच्या सेटवरील 'एक्स कपल' असेही म्हटले जात होते.   

'डीजे वाले बाबू' या गाण्यामुळं नताशा प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर सत्याग्रह (2013), फुकरे रिटर्न्स (2017) या चित्रपटांतही तिने छोट्या भूमिका साकारल्या आहेत. डॅडी (2017)मध्ये तिने एक आयटम साँगही केले आहे. तसेच बिग बॉसच्या आठव्या सीझनमध्येही नताशा सहभागी झाली होती. तसेच 2018 मध्ये आलेल्या अभिनेता शाहरुख खानच्या बहुचर्चित 'झीरो' या चित्रपटात नताशाने काम केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News