WT20 World Cup : पुनम यादवचा बोलबाला मात्र या पाच खेळाडूंनी झुकवलं ऑस्ट्रेलियाला

यिनबझ टीम
Saturday, 22 February 2020

सध्या सिडनीमध्ये महिला टी-20 विश्वकप सुरू आहे. भारतीय संघ ऑस्ट्रलिया, बांग्लादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका सोबत ग्रुप अ मध्ये आहे.

सध्या सिडनीमध्ये महिला टी-20 विश्वकप सुरू आहे. भारतीय संघ ऑस्ट्रलिया, बांग्लादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका सोबत ग्रुप अ मध्ये आहे. त्यात भारतीय संघाकडून जोरदारी कामगिरी होत असताना दिसत आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाविरुध्द झालेल्या सामन्यात भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत गतवर्षीचा विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला नमवलं आहे. 

सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुध्द झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ 17 धावांनी जिंकला. भारताने 20 षटकांमध्ये 132 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं होतं, त्या आव्हानांचा पाठलाग करत असाताना ऑस्ट्रेलिया संघ 19.5 षटकांमध्ये 115 धावा करत पुर्णबाद झाला. 

या सगळ्या सामन्याचं श्रेय संपुर्णरित्या पुनम यादवला दिले जात असताना इतर पाच खेळांडूंनी चांगली कामगिरी केली असल्याचे दिसून येते. कोण आहेत त्या पाच खेळाडू ते आपण पाहूयात...

या सामन्यात स्टार खेळाडू ठरली ती म्हणजे पुनम यादव. त्यामुळे पहिल्याच सामन्यात मॅन ऑफ दि मॅचचा पुरस्कार जिंकून "हम भी किसीसे कम नही", हे सांगून दिलं आहे. मात्र तिच्यासोबतच दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, शिखा पांडे, हरमनप्रीत कौर यांचादेखील समावेश होता.

पूनमने ऑस्ट्रेलियाच्या एलिसाला (51 धावा) झेलबाद आणि बोल्ड करुन बाद केले आणि तिथून ऑस्ट्रेलियाची घसरण सुरू झाली. त्यानंतर 12 व्या षटकात पुनमने सामन्याचा चेहरा बदलला. 12व्या षटकात सलग दोन गडी बाद करत सामना भारताच्या पारड्यात घेतला. 12 व्या षटकाच्या तिसऱ्या बॉलवर पूनमने राहेल हेनेस (06) आणि चौथ्या चेंडूवर एलिस पेरीला (0) बाद केले. या षटकात हॅटट्रिकची संधी असताना भारताच्या तान्याने जोनाथनची झेल सोडली आणि पुनमची हॅटट्रिक हुकली.

दीप्ती शर्मा : नाणेफेकीनंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताचे सुरवातीच्या फलंदाजांकडून चांगली फलंदाजी झाली नाही. अशा परिस्थितीत दीप्तीने आपली बाजू सांभाळत भारताला 132 धावांपर्यंत पोहोचवले.  पाचव्या क्रमांकावर खेळताना दीप्तीने 46 चेंडूत 49 धावा केल्या. इतकेच नाही तर नंतर तिच्याकडे गोलंदाजीचीही जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्यावेळी तिने 4 ओव्हर टाकत फक्त 17 धावा दिल्या.

शफाली वर्मा: भारतीय संघाला सामन्यात केवळ 132 धावा करता आल्या. पण युवा फलंदाज शफाली वर्माने संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. पहिल्या सहा षटकांत वेगवान फलंदाजी करत 15 चेंडूत 29 धावा केल्या. या दरम्यान तिने 5 चौकार आणि एक षटकार लगावला. तिच्या वेगवान फलंदाजीमुळे संघाची चांगली सुरुवात झाली.

शिखा पांडे : टीमची सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज. शिखाने या सामन्यात मोठं योगदान दिलं आहे. 3.5 ओव्हर टाकत फक्त 14 धावा देत 3 विकेट्स तिने आपल्या नावावर नोंदवले आहेत. तिने सलामीवीर बिथ मूनी (6), एशले गार्डनर (34 धावा), सुदरलैंड (२ धावा) यांना बाद केले. पूनमनंतर शिखाही संघातील दुसरी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली.

हरमनप्रीत कौर : कर्णधार हरमनप्रीत कौरनेही या सामन्यात चांगले काम केले. जरी स्वत: हर्मनने  दोन धावा केल्या असल्या तरी गोलंदाजीमध्ये आपल्या खेळाडूंचा तिने योग्य वापर केला. नवव्या षटकानंतर तिने सर्वात मोठ्या खेळाडूला बोलावलं. तिने पूनमला 10 व्या षटकात गोलंदाजीसाठी आणले. त्याने फिरकीपटू दीप्तीकडे सामन्याची सुरुवात दिली, त्यावेळी षटकांत दीप्तीने अत्यंत काळजीपुर्वक गोलंदाजी करत पॉवरप्लेच्या तीन षटकांत केवळ 11 धावा दिल्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News