चिनीवस्तूवर बंदी घालून चीनवरचा राग व्यक्त करणे पुरेशे ठरेल काय ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020

चिनीवस्तूवर बंदी घालून चीनवरचा राग व्यक्त करणे पुरेशे ठरेल काय ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

चिनीवस्तूवर बंदी घालून चीनवरचा राग व्यक्त करणे पुरेशे ठरेल काय ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

चीनच्या वस्तू सगळ्यात स्वस्त अशी मानसिकता तयार झालेली भारतीय लोकं महागड्या स्वदेशी वस्तू खरेदी करतील काय ? त्याचबरोबर चीनच्या वस्तू या तात्पुरता इलाज अशी मानसिकता असलेली लोक सुधारतील का असे अनेक प्रश्न पडतात. कोरोना सारखा भयानक संसर्गजन्य आजार चीनमध्ये उगम पावला. त्यामुळे भारताने अनेक चीनच्या वस्तूवर बंदी घातली. त्याचबरोबर अनेक देशांनी सुध्दा चीनच्या मालावर बंदी घातली आहे. ही बंदी योग्य की अयोग्य या अनुशंगाने चिनीवस्तूवर बंदी घालून..चीनवरचा राग व्यक्त करणे पुरेशे ठरेल काय ? या विषयावर आज 'यिनबझ'च्या अनेक ग्रुपमध्ये तरूणांनी मनसोक्त चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मते आणि प्रतिक्रिया आम्ही येथे देत आहोत.

महात्मा गांधींनी जेव्हा स्वदेशीचा नारा दिला. तेव्हा त्यांनी सांगितले होते, की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वयंपूर्ण बनले पाहिजे. आज आपण फुग्यापासून ते मोबाईल पर्यंत अनेक गोष्टी चीन मधून आयात केल्या जातात. आपण चिनी वस्तूवर बहिष्कार टाकला, तरी दुसऱ्या आयात केलेल्या वस्तू सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीयेत चीनचा माल स्वस्त आहे परंतु टिकाऊ नाही. आपल्याला अशा टिकाऊ व गुणवत्ताधारक वस्तू तयार करून चीनला मात देऊ शकतो. मोदींच्या मेक इन इंडिया मध्ये विदेशी गम विदेशी गुंतवणूक होत असताना हा बहिष्कार कितपत योग्य आहे

- निसार नायकवडी (फौजी)

चिनी वस्तूंवर बंदी घालणे हा एक राग व्यक्त करण्यासाठीचा पर्याय झाला ...खरे सांगायचे तर चिनी वस्तू आपल्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरल्या आहेत ...की अगदी रक्षाबंधनाच्या राखी पासून ते घरातल्या एका छोट्या छोट्या ठोकळ्या एवढ्या वस्तूंमध्ये चिनी माल दिसून येत आहे ... त्यामुळे विरोध हा कितपत करावा आणि त्याचा खरा उपयोग कितपत होईल ...ह्याचा अंदाज लावणे गरजेचे ..माझ्या मते  विरोध किंवा बंदी घालण्यापेक्षा आपल्या देशातल्या स्वदेशी वस्तुंना अधिक मोठ्या प्रमाणात मागणी केली जाईल...

चीनवरचा राग येण स्वाभाविक आहे ...कारण आज जग ज्या परिस्थितीतुन जात आहे त्याला सर्वस्वी कारणीभूत हा चीन देश आहे ...पण व्यापाराच्या तुलनेत आज चीन ने स्वतःच्या वस्तूंचा प्रसार इतर देशांमध्ये तसेच आपल्या देशात अधिक प्रमाणात करून ठेवला आहे...साधे सणा सुधीला लागणारे डेकोरेशन साहित्य हे बघितले तर चीन वस्तूंनी भरले आहे ...एवढेच काय आपण ज्या देशाला किंवा त्यांच्या वस्तूला विरोध दर्शवतो आहे ...तो विरोध सुद्धा कदाचित एका चिनी मॉडेल असलेल्या मोबाईल वरूनच ....त्यामुळे आपल्या चिनी गरजा कमी करून स्वदेशी वस्तूंकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायला हवा..

आपल्या देशातल्या वस्तूंचा  व्यापार वाढवला तर नक्कीच ह्या चिनी वस्तुंना बाजारात मागणी कमी होईल ...आणि विरोध आणि बंदी करण्यापेक्षा त्यांना तोडीसतोड आपल्या वस्तूं आकर्षक बनविण्याकडे  लक्ष दिले पाहिजे ...कारण साध्या वस्तूमध्ये आकर्षक वस्तुंना मागणी जास्त असते त्याप्रमाणे आपल्या वस्तू बनवणे गरजेचे आहे असे मला वाटते...

- हर्षदा पाटे

चिनी वस्तूवर राग काढणं त्या तोडणं म्हणजे स्वतःला मूर्ख घोषित करण्यासारखं आहे, असं मला वाटतंय कारण ज्या वस्तू किंवा सेवाचं मूल्य आपण चीनला दिल आहे. त्या वस्तू तोडणं म्हणजे स्वतःच आणि देशाच नुकसान करणं अस मला वाटतंय. त्या देशातील वस्तूचा वापर करून आपल्या देशाची प्रगती होत असेल,आणि आपण महासतेकडे वळत असू तर नक्की त्या देशातून आयात करावी किंवा त्याच दर्जाचं वस्तू आपल्या देशात तयार करावे. चीन कोणत्याही वस्तू तयार करत त्यावेळेस ते large scales वर तयार करते जेनेकरून वस्तूची निर्मिती कमी पैशात होते.

आणि पुरवठा व्यवस्थित होतो. म्हणून लोक विचार न करतात चिनी वस्तू विकत घेतात कारण लोकांना त्यांच्या बजेट मध्ये सर्व हवं असतं आणि चिनी वस्तू त्यांच्या बजेट मध्ये बसतात. आपल्याकडे सर्व क्षेत्रात असं घडताना दिसत नाही.

 कोरोना ह्या रोगाचा जन्म हा चीन मध्ये झाला हे उघड सत्य आहे. यामुळे चीन मधील कंपन्या भारतात येणार अशी अफवा बाजारात बरीच चर्चा चालू होती. पण वास्तवात खर्च असं काही दिसलं नाही. कारण चीनमध्ये जे वातावरण कारखान्यांना लागत. ते उपलब्ध आहे. जागा श्रम बळ करणारे लोक आणि सर्वात काम करण्याची इच्छा असणारे लोक हे चीन मध्ये आहे. म्हणून इतर देशही  त्यांच्या कंपन्या चीनमध्ये टाकतात. आशा चीनची बाजू घेण्याचा माझा व्यक्तीगत मत नाही आहे. व्यवसाय चालवण्याकरिता काही गोष्टी आवश्यक असतात ते चीन बाखुबी ओळखत म्हणून जगाच्या व्यापारात चीन अग्रेसर आहे, असे असे सर्व अर्थ विशेषक म्हणतात.
म्हणून माझं असं मतं आहे की चिनी वस्तू निर्बंध लादणे पुरेशे नाही. महासत्ता होण्यासाठी इतर देशाची व्यापार करावं लागतो

- विजयकुमार कटारे

तस पाहायला गेलं तर, बाजारपेठेवर चिनी वस्तूंचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पाहायला मिळतो. स्वस्तात मस्त या वस्तू असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने याकडे आकर्षित होतो. फक्त या ग्राहकउपयोगी नाही तर मोठ्या प्रमाणात कच्चा माल देखील चीन मधून आयात केला जातो. ज्यात औषधासाठी महत्वाच्या घटकाचा समावेश होतो. यामुळे चीनच्या वस्तूवर पूर्णतः बंदी घालून चालणार नाही.

एखादा देश केव्हा महासत्ता बनतो जेव्हा त्याच्या हातात आर्थिक सत्ता असते. जी विविधअंगी त्याला मजबूत करते. जेव्हा त्याच्या आर्थिक घडीवर लगाम येतो तेव्हा त्या देशाला चपराक बसला अस म्हणता येईल. चीनमधून आपण दरवर्षी कितीतरी अब्ज कोटींची आयात करतो. म्हणजे काय तर एवढे अब्ज आपण चीनला देतो.

आपण जेव्हा आपली अर्थव्यवस्था खुली केली तेव्हा काही नियमावली ठरवली गेली होती, ज्यात सरकार थेट आयात बंद करू शकत नाही. जेव्हा जनता हा माल घेण्याचं टाळत तेव्हा आयात बंद करू शकतो. चीनच्या सर्व वस्तूवर आपण बहिष्कार टाकू शकत नाही पण, अश्या वस्तुवर नक्कीच बहिष्कार टाकू शकतो ज्याच्या तोडीला भारतीय बनावटीच्या बस्तू बाजारपेठेत उपलब्ध आहेत....

- विनायक पाटील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News