जगातील सर्वात महागडा परफ्युम, किम्मत आईकुन थक्क व्हाल, वाचा ...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 April 2019

परफ्युमचे वेगवेगळे ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत. पण जगातला सर्वात महागडा परफ्युम बनवल्याचा दावा सौदी अरब अमिरातीनं केला. शमुख असं या परफ्युमचं नाव ठेवण्यात आलंय. 

तुम्ही आम्ही दररोज परफ्युम वापरतो...आपण रोजच ऑफिस किंवा कामानिमित्त बाहेर जाताना एखादे परफ्यूम मारल्यानंतर दिवसभर फ्रेश वाटते. कोणालाही सुंगधाचे आकर्षण वाटणे सहाजिकच आहे. पुर्वीच्या काळात हे परफ्यूम, सुगंधी अत्तर फुलांपासून तयार केली जायची. मात्र आता अनेक विविध कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम, डियोडरेंट तयार करतात. परफ्युमचे वेगवेगळे ब्रँड बाजारात उपलब्ध आहेत. पण जगातला सर्वात महागडा परफ्युम बनवल्याचा दावा सौदी अरब अमिरातीनं केला. शमुख असं या परफ्युमचं नाव ठेवण्यात आलंय. 

किंमत फक्त 8 कोटी 93 लाख !

परफ्युम लावणं अनेकांना आवडतं...काहींचे तर खास ब्रँडही ठरलेले असतात. परफ्युम प्रेमींचा शौक जितका महागडा तितकीच जास्त किंमतही परफ्युमची असते. पण आता जगातील सर्वात महागडा परफ्युम बनवण्यात आल्याचा दावा सौदी अरब अमिरातीनं केलाय. या परफ्युमचं नाव शमुख असं ठेवण्यात आलंय. या अरबी शब्दाचा अर्थ सर्वात योग्य असा आहे. या परफ्युमच्या तीन लिटरच्या बाटलीची किंमत 8 कोटी 93 लाख रुपये इतकी आहे. अमिरातीच्या नोबिल परफ्युम ग्रुपनं तीन वर्ष संशोधन करून हा परफ्युम तयार केलाय. 

महागड्या परफ्युमची गिनीज बुकात नोंद  

 
गिनीज बुक मध्ये या परफ्युमच्या बाटलीनं दोन विक्रम नोंदविले आहेत. या परफ्युमसाठी विशेष प्रकारची इटालियन मुरानो क्रिस्टलची बाटली तयार करण्यात आलीय. अतिशय महागड्या अशा बाटलीवर सोन्याचा ससाणा, अरबी घोडे, गुलाब आणि एक ग्लोब बसवण्यात आलं. त्यासाठी त्यासाठी 38 कॅरेटचे हिरे, 18 कॅरेट गोल्डचा अडीच किलो वजनाचा मोती आणि 6  किलो चांदीचा वापर केला गेलाय. 30 मार्चपर्यंत दुबईत ही परफ्युम बॉटल लोकांना पाहता यावी म्हणून एका मॉलमध्ये ठेवण्यात आली होती. आता इतकं महागडं परफ्युम विकत घ्यायचं म्हंटलं तर आसामीही तशीच असायला हवी. त्यामुळे जगात सगळ्यात महागडं ठरलेलं हे शमुख परफ्युम कुणाला सुगंधित करते याचीच उत्सुकता दुबईकरांना लागलीय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News