जगातील सर्वात मोठी कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 September 2020

जगातील सर्वात मोठी कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या

जगातील सर्वात मोठी कंपनी देणार 1 लाख नोकऱ्या

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोक-या गेल्या आहेत, अनेकांनी उदरनिर्वाह करण्यासाठी असलेल्या तुरळक भांडवलाचा उपयोग करून छोटे उद्योग सुरू केले. तसेच कोरोनाचा कार्यकाळ निश्चित नसल्याने पुर्वीसारखी परिस्थिती केव्हा येईल हे कोणीचं निश्चित सांगू शकत नाही. अशातचं जगातील सर्वात मोठी e-commerce कंपनी एक लाख लोकांना नोकरी देणार आहे. अमेझॉनने याबाबत नुकतीच घोषणा केली असून याबाबतची अधिकृत माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

अमेझॉन कंपनीने यावर्षीच्या सुरूवातीला १ लाख ७५ हजार लोकांना नोकरी देण्यात आली आहे. आता केली जाणारी भरती वितरणाच्या कामासाठी असून बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी असून पार्ट टाइम आणि फुल टाइम कामासाठी भरती होणार असून पॅकिंग, शिपिंग आणि सॉर्टिंग विभागात ही नोकरभरती केली जाणार आहे.

भरती विषयी अधिक माहिती सांगताना कंपनीने म्हटले आहे की, सध्या कंपनीला 100 नवीन वेअरहाऊस आणि अन्य कामासाठी भरती केली जाणार आहे. या वेअर हाऊसचं काम पाहणा-या एलिसिया बोलर डेविस यांनी याविषयी सांगितले की, अमेझॉन कंपनीकडून काही शहरांमध्ये १,००० डॉलर साइन इन बोनस देण्यात आले आहेत. कोरोनाच्या काळात डेट्रॉइट, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया आणि लुइविले, केंटकीमध्ये कामगार मिळणं अधिक अवघड आहे. विशेष म्हणजे सुरूवातीला कंपनीकडून प्रतितास १५ डॉलर इतकं वेतन देण्यात येणार आहे. अमेझॉन कंपनीला कॉर्पोरेट आणि तांत्रिक कामांसाठी ३३,००० हजार कामगारांची गरज सुध्दा लागणार आहे. कोरोनाच्या काळात कंपनीने चांगली कमाई केली.

वेअरहाऊसमध्ये अनेकदा अनेक गोष्टी इकडे तिकडे झालेल्या असतात, तेव्हा तेथील सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी ही भरती करण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवसात कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑडर मिळतात. त्या दिवशी कोणतीही गडबड होऊ यासाठी ही काळजी घेतली जाते. त्यामुळे १ लाख लोकांची भरती करण्यात येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News