#worldcup_2019 - चीटर म्हणू नका टाळ्या वाजवा विराटाचे प्रेक्षकांना आव्हान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

लंडन - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे प्रेक्षकांसाठी उत्तम क्रिकेटची पर्वणी असते. कालचा सामनाही याला अपवाद नव्हता. मात्र, भारतीय संघाच्या विजयापेक्षा सर्वांत जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे विराट कोहलीने दाखविलेली खिलाडूवृत्ती. विराट फलंदाजी करत असताना काही प्रेक्षक बहुतेक त्यातील काही भारतीय असावेत, स्टीव स्मिथ आणि वॉर्नरला उद्देषून त्यांची चेंडू कुरतडल्या प्रकरणी हुर्यो उडवत होते, हे विराटच्या लक्षात आले त्याने लगेचच प्रेक्षकांकडे पाहात, तुम्ही असे करू नका त्यांना प्रोत्साहीत करा असे हातवारे करून सांगितले.

स्मिथ सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना लोकांनी त्याच्याकडे पाहून चिटर चिटर म्हणायला सुरवात केली. कोहलीने मात्र, त्यांना चिटर म्हणू नका, टाळ्या वाजवा असे सांगितले. प्रेक्षकांना विराटची सुचना ऐकली आणि स्मिथ, वॉर्नरला टाळयांनी दाद दिली. विराटचा हा खिळाडूपणा आणि स्मिथच्या लक्षात आला आणि हस्तांदोलन करून विराटचे आभार मानले.सामन्यानंतर याबाबत बोलताना विराट म्हणाला, ''त्याने माफी मागितली आहे. आता त्याची हुर्यो उडविण्याची गरज नाही. मला भारतीय चाहत्यांना असे करुन चुकीचे उदाहरण बनणे मान्य नव्हते. माझ्याबाबतीतही हेच घडले असते तर मलाही आवडले नसते.''

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News