#worldcup 'ही' आहे विराटची अदा, जिसपर सारे फिदा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

वर्ल्ड कपचे काऊंटडाऊन सुरु झाले तेव्हा संयोजन समितीने सहभागी संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद आयोजित केली. त्यावेळी एक फोटो सेशनही झाले. त्यात विराट कोहलीला आगळेवेगळे स्थान मिळाले, जे अढळ ठरणार का याची मोहीम आता काही तासांत सुरु होईल.

वर्ल्ड कपचे काऊंटडाऊन सुरु झाले तेव्हा संयोजन समितीने सहभागी संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद आयोजित केली. त्यावेळी एक फोटो सेशनही झाले. त्यात विराट कोहलीला आगळेवेगळे स्थान मिळाले, जे अढळ ठरणार का याची मोहीम आता काही तासांत सुरु होईल.

या फोटोत न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर बाजूला उभे आहेत. सोफ्यावर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा अॅरॉन फिंच आणि पाकिस्तानचा सर्फराज अहमद हे दोघे बसले आहेत. सोफ्याला हात टेकण्यासाठी असलेल्या बाजूवर यजमान इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन बसला आहे. दुसऱ्या बाजूला बांगलादेशचा मश्रफी मोर्तझा बसला आहे.दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डूप्लेसी याला वेगळे आसन आहे, पण ते कोपऱ्यात आहे. श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने आणि अफगाणिस्तानचा गुलबदीन नईब सोफ्याच्या मागे उभे आहेत. यात सर्फराज सोडून प्रत्येक कर्णधाराने हे जणू काही मॉडेलिंगचे फोटोशूट असल्याप्रमाणे पोझ दिल्या आहेत. सर्फराज मात्र अवघडून बसल्यासारखा दिसतो आहे. त्यावर पाक क्रिकेटप्रेमींनी त्याचे बरेच ट्रोलिंग केले.

विराटप्रमाणेच फिंच याची पोझही जबरदस्त आहे, पण विराटचे वेगळेपण असे की वर्ल्ड कप ट्रॉफी त्याच्या पायाजवळ आहे. त्याची मैदानावरील देहबोली या फोटोतून परावर्तित होते. त्याने डावा हात खुर्चीच्या बाजूवर ठेवला आहे. त्या बलदंड हातावरील टॅटू त्यातून वेगळी रंगसंगती साधते. त्याने स्माईल सुद्धा असे दिले आहे की, ज्यावर आता हा कप आपलाच असे दिसते.विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीच्या सामन्याच्या पूर्वसंध्येस एक ट्विट केले. त्यात तो गडगडाटी हास्य करताना दिसतो आहे. त्याखाली हास्य हे सर्वाधिक गुणकारी औषध असल्याचे लिहीले आहे. विराट हा जगज्जेता खेळाडू आहे, पण कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच कप आहे. फोटोशूटमधील अढळ स्थान तो प्राप्त करणार का याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले असेल.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News