#world_cup - भारताचा विजयासाठी संघर्ष आणि बरच काही...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा सुरु झाल्यावर जवळपास आठवड्याभरानी शड्डू ठोकत मैदानात उतरणाऱ्या टीम इंडियाने सलामीलाच विजय मिळवत आपल्या आगमाची वर्दी क्रिकेट विश्वाला दिली

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा सुरु झाल्यावर जवळपास आठवड्याभरानी शड्डू ठोकत मैदानात उतरणाऱ्या टीम इंडियाने सलामीलाच विजय मिळवत आपल्या आगमाची वर्दी क्रिकेट विश्वाला दिली. स्पर्धेत खेळत असलेल्या सर्व संघांना इशाराही दिला. तसे पहायला गेले तर पराभवाच्या खाईत गटांगळ्या खाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेवर विजय अपेक्षित होता, पण त्यासाठी पूर्ण 50 षटके गोलंदाजी करावी लागली आणि विजयी लक्ष्य पार करण्यासाठी 47.3 षटके मैदानात रहावे लागले.

या संपूर्ण सामन्याचे विस्लेषण करायचे म्हटले तर हे एका अर्थी चांगलेच झाले. पराभवातून जसे शिकता येत असते तसे विजयातूनही काही बोध मिळत असतो. टीम इंडियाला तो कसा मिळाला हे पाहू..

पकड मिळवली आता मुसक्या बांधा गोलंदाजी करताना सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद करून पकड मिळवली तर ती अखेरपर्यंत कायम रखायला हवी. श्वास घेण्याची संधी प्रतिस्पर्ध्यांना देता नये. बुधवारच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची 7 बाद 158 अशी अवस्था केली होती त्यानंतर त्यांनी 227 धावा केल्या. आठवा फलंदाज बाद करण्यासाठी दहा षटके खर्ची घालावी लागली. गोलंदाजीस उपयुक्त असलेल्या परिस्थितीत वाढलेले आव्हान डोकेदूखी ठरू शकते. तसेच अनेक सामन्यात प्रतिस्पर्ध्यांचे शेपूट भारताला नेहमीच त्रासदाय ठरलेले आहे.

पाचव्या गोलंदाजाचा प्रश्न

दक्षिण आफ्रिकेविरूदच्या या सामन्यात भारताने चारच प्रमुख गोलंदाज (बुमरा, भुवनेश्वर, चहल, कुलदीप) खेळवले आणि पाचव्या गोलंदाजाच्या दहा षटकांसाठी हार्दिक पंड्या-केदार जाधव यांना वाटेकरी केले. या सामन्यात प्रमुख गोलदाजांनी विकेट मिळवल्या पण पंड्या (6) आणि केदार (4) यांनी टाकलेल्या दहा षटकांत 47 धावा दिल्या. परिस्थिती गोलंदाजीस अनुकुल असल्याने त्यांच्याविरूद्ध अधिक धावा काढल्या नाहीत हे सुदैव. पण फलंदाजीस उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर ते महागडे ठरले तर ? म्हणून प्रामुख्याने हार्दिकने वेगाच्या नादी न लागता अचुकतेवर भर द्यावा. कारण अशा कमकूवर बाजूवर ऑस्ट्रेलियासारखा संघ मीठ चोळू शकतो.

किमान एकाने अखेपर्यंत खेळावे

प्रमुख फलंदाज अखेरपर्यंत मैदानात राहिला तर विजय मिळवण्याचे दडपण कसे कमी होते हे दिसून आले. आणि फलंदाजी सोपी नसेल तर त्या खेळाची मोल फारच मोठे असते. रोहित शर्माकडे अधिक काळ खेळपट्टीवर रहाण्याची क्षमता आहे आणि तो जेवढे जास्त वेळ खेळतो तेवढा त्याचा स्ट्राईक रेट वाढत जातो. एकदिवसीय क्रिकेटमधील तीन द्विशतके त्याने अशीच झळकावलेली आहेत. प्रत्येक वेळी रोहित शर्माकडून अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे, त्यासाठी रोहित आणि केएल राहुल या पैकी एक फलंदाज अखेपरर्यंत खेळपट्टी रहाणे आवश्यक आहे. त्यामुळे एक बाजू भक्कम होईल आणि दुसऱ्या बाजूने शिखर धवन, विराट कोहली, हार्दिक पंड्या, धोनी यांच्याकडे आक्रमणाची जबाबदारी द्यावी.

सुरुवातीची षटके आहेत मोलाची

या स्पर्धेसाठी ड्युक बनावटीचे चेंडू वापरले जात आहेत हे चेंडू लकाकी असताना चांगले स्विंग होतात त्यातच दोन्ही बाजूने दोन चेंडू वापरले जातात म्हणजे 20 षटकांचा खेळ झाला तरी एक चेंडू 10 षटके एवढाच जून झालेला असतो अशा परिस्थितीत धावांचा वेग किती यावर भर न देता सावधानतेवर भर द्यावा. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात हेच सिद्ध होते.भारताचे पुढील तीन सामने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्ताविरूद्ध होणार आहे. तिघेही तगडे प्रतिस्पर्धी आहेत. वरील फॉर्म्यूला कायम ठेवला तर विजय मिळवणे कठिण जाणार नाही हे निश्चित.....

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News